ETV Bharat / bharat

बसची टेम्पोला जोरदार धडक; अपघातात 15 जणांचा मृत्यू, तेराव्याचा कार्यक्रम आटोपून परतत होते घरी - Bus Tempo Road Accident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 8:06 PM IST

Updated : Sep 6, 2024, 9:23 PM IST

Bus Tempo Road Accident in Hathras : प्रवासी बसनं टेम्पोला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास 15 जणांचा मृत्यू झालाय. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केलंय. उत्तर प्रदेशातील हातरस येथे हा भीषण अपघात झाला.

Horrific road accident in Hathras
हातरस अपघात (ETV Bharat)

हातरस (उत्तर प्रदेश) Bus Tempo Road Accident in Hathras : हातरसमधील चांदपा कोतवाली परिसरात शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. चांदपा कोतवाली परिसरातील मीताई बायपासवर अलीगड डेपोची बस लोडर टेम्पोला धडकली. टेम्पोमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलं प्रवास करत होते. या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर तब्बल 16 जण यात गंभीर जखमी झाले आहेत.

हातरसमध्ये भीषण अपघात (ETV Bharat)

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त : हातरस अपघातावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

जखमींना रुग्णालयात केलं दाखल : प्रवासी बस ही टेम्पोलो जोरात धडकल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल, जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार, सीओ हिमांशू माथूर पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले.

भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू : "आग्रा-अलिगड राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करताना रोडवेजच्या बसनं लोडर टेम्पोला धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उच्च केंद्रात पाठवण्यात आलंय," अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार यांनी दिली.

तेराव्याचा कार्यक्रम आटोपून परतत होते घरी : "अपघातातील सर्व जखमी सासनीहून खंडौलीकडं जात होते. चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर मृतांची ओळख पटवली जात आहे. तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जवळपास ३० लोक टेम्पोमधून आपापल्या घरी परतत होते. या टेम्पोमध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्धांचाही समावेश होता," अशी माहिती पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी दिली.

हेही वाचा - केदारनाथमध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टर वाहून नेताना कोसळलं मंदाकिनी नदीत - Uttarakhand Helicopter Crash

Last Updated : Sep 6, 2024, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.