कन्नूर Man Arrested for Killing Peacock : केरळमधील कन्नूर येथील तालिपरंबा येथील रहिवासी असलेल्या थॉमसला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या थॉमसला सध्या न्यायालयीन हजेरी आणि रिमांडनंतर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलंय. थॉमसनं आपल्या बचावात सांगितलं की, मोराच्या पायाला थोडी दुखापत झाली होती. तो जगू शकणार नाही असं त्याला वाटलं. त्यामुळं त्यानं मोर मारला.
वनविभागाचं म्हणणं काय : आरोपी थॉमस यानं मोरावर काठीनं वार केला. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला. नंतर त्यानं मांस काढून घेऊन इतर भागाची जवळच्या विहिरीत विल्हेवाट लावली. मात्र, असं असलं तरी तालिपरंबा रेंज ऑफिसर पी रथेश आणि त्यांच्या टीमला थॉमस जे सांगत आहे, त्यावर विश्वास नाही. ही घटना घडलेल्या परिसरात विरळ लोकवस्ती असल्यानं हा मोर जाळ्यात अडकण्याची भीती वनविभागानं व्यक्त केली आहे. शिवाय ज्या विहिरीत हे अवशेष टाकण्यात आले होते ती विहीर सर्वसामान्यांना उपलब्ध नसल्यानं संशय आणखी वाढला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मोराची हत्या हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, असं वनविभागाचं म्हणणं आहे.
गेल्या महिन्यात अशाच एका प्रकरणात तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील यूट्यूबर विरुद्ध त्याच्या चॅनेलवर 'पीकॉक करी रेसिपी' संदर्भात व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर भारतीय मोर, Pavo cristatus हा 1963 पासून भारताचा राष्ट्रीय पक्षी असून तो भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची I अंतर्गत संरक्षित दर्जा प्राप्त करतो. मोराच्या हत्येला सक्त मनाई असून कलम 51(1-A) नुसार सात वर्षांपर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयांपेक्षा कमी नसलेल्या दंडाची तरतूदही आहे.
हेही वाचा -