ETV Bharat / bharat

महावीर जयंती 2024 : भगवान महाविरांच्या प्रेरणादायी विचारांबाबत जाणून घ्या 'या' खास गोष्टी - mahavir jayanti 2024

Mahavir Jayanti 2024 : आज 21 एप्रिल रोजी भगवान महावीर यांची जयंती आहे. या खास प्रसंगी त्याच्याबद्दल काही विशेष गोष्टी जाणून घ्या...

Mahavir Jayanti 2024
महावीर जयंती 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 2:18 PM IST

मुंबई Mahavir Jayanti 2024 : आज देशभरात जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती साजरी होत आहे. हा उत्सव जैन धर्माचे शेवटचे आणि 24वे तीर्थंकर स्वामी महावीर यांना समर्पित असून हा दिवस खूप विशेष आहे. जैन धर्माच्या मान्यतेनुसार महावीरजींचा जन्म हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला झाला होता. या दिवशी जैन धर्माचे लोक भगवान महावीरांची पूजा करुन सुख - समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भगवान महावीरांनी जगाला दिलेले पंचशील तत्व आजही लोकांचे मार्गदर्शन करते. राजाच्या घरी जन्मलेले वर्धमान जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कसे बनले हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भगवान महावीर यांनी केला त्याग : भगवान महावीर स्वामींचा जन्म कुंडग्राम येथे इ. स. पूर्व 599 मध्ये वज्जी प्रजासत्ताकचा राजा सिद्धार्थ यांच्याकडं झाला होता. त्यांच्या आईचे नाव त्रिशला होतं, त्यांना प्रियकारिणी असेही म्हणतात. कुंडग्राम हे सध्या बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात येते. राजा सिद्धार्थाच्या घरी वर्धमानाचा जन्म होताच राज्यात मान, प्रतिष्ठा आणि संपत्तीमध्ये भरभराट होऊ लागली, त्यामुळेचं त्यांचं नाव वर्धमान असं ठेवण्यात आलं होतं. वर्धमान हे सुरुवातीपासूनच धैर्यवान आणि निर्भय स्वभावाचे होते. त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी राजवैभवाचा त्याग करुन संन्यास घेऊन आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकार करुन एक प्रवास सुरू केला. सुमारे 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांनी आपल्या इच्छा आणि दुर्गुणांवर नियंत्रण मिळवले.

महावीर स्वामींनी केली चार तीर्थांची स्थापना : यानंतर त्यांना यादरम्यान कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. या कठोर तपश्चर्येनंतरच वर्धमान यांना महावीर म्हटलं गेलं. कैवल्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर महावीर स्वामींनी चार तीर्थांची स्थापना केली. यामध्ये साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका यांचा समावेश आहे. हे ऐहिक तीर्थ नसून एक तत्व आहे. यामध्ये सत्य, अहिंसा, एकपत्नीत्व आणि तपस्याचे पालन करुन आत्म्याला तीर्थ बनवण्याचा मार्ग जैन धर्मामध्ये आहे. यानंतर स्वामी महावीर यांनी वयाच्या 72 व्या वर्षी पावापुरी येथून मोक्ष प्राप्त केला. भगवान महावीरांनी लोकांना समृद्ध जीवन आणि आंतरिक शांती मिळविण्यासाठी पाच तत्त्वे सांगितली होती. याला महावीरांची पाच तत्त्वे म्हणतात.

महावीरांची पाच तत्त्वे :

अहिंसा- भगवान महावीरांचे पहिले तत्व अहिंसा असून या तत्वात त्यांनी जैन लोकांना प्रत्येक परिस्थितीत हिंसेपासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. चुकूनही कोणाचे मन दुखवू नये, असेही त्यांनी सांगितले.

सत्य- भगवान महावीरांचे दुसरे तत्व सत्य आहे. भगवान महावीर म्हणतात, हे मनुष्य! तू सत्यालाच सत्य तत्व मान. सत्याच्या सहवासात राहणारा बुद्धिमान व्यक्ती मृत्यूला चांगल्याप्रकारे प्राप्त करतो. यामधून त्यांनी लोकांना नेहमी सत्य बोलण्याची प्रेरणा दिली.

अस्तेय- भगवान महावीरांचे तिसरे तत्व म्हणजे अस्तेय. जे अस्तेयांचे पालन करतात ते कोणत्याही स्वरुपात त्यांच्या इच्छेनुसार काहीही स्वीकारत नाहीत, असे लोक जीवनात नेहमी संयमी राहतात आणि त्यांना जे दिले जाते तेच ते घेतात. त्यालाचं अस्तेय म्हटलं जाते.

ब्रह्मचर्य- भगवान महावीरांचे चौथे तत्व ब्रह्मचर्य आहे. या तत्त्वामध्ये जैन व्यक्तींना पवित्रतेचे गुण प्रदर्शित करावे लागते. या अंतर्गत त्यांना कामुक गोष्टीपासून दूर राहावे लागते.

अपरिग्रह- पाचवे शेवटचे तत्व अपरिग्रह आहे, ही शिकवण सर्व तत्त्वांना एकत्र करते. असे मानले जाते की अपरिग्रहाचे पालन केल्यानं जैनांची चेतना जागृत होते आणि यामधून सांसारिक आणि सुख- सोयीचा वस्तूंचा त्याग केल्या जातो.

हेही वाचा :

  1. पंकज त्रिपाठीच्या मेहुण्याचं अपघातात निधन, बहीणही गंभीर जखमी - PANKAJ TRIPATHI BROTHER IN LAW DIED
  2. शमिता शेट्टीनं सुंदर पेंटिंग करताना व्हिडिओ केला शेअर, चाहत्यांनी केलं कौतुक - shamita shetty
  3. पुष्कर जोगचा स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरू असताना अपघात, पाहा व्हिडिओ - Pushkar Jog

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.