ETV Bharat / bharat

आता रामभक्तांसाठी खुशखबर; अयोध्येत होणार महाराष्ट्र सदन, मंत्री रवींद्र चव्हाणांनी केली जागेची पाहणी - Ravindra Chavan In Aydhya - RAVINDRA CHAVAN IN AYDHYA

Ravindra Chavan In Ayodhya : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या विभागातील 70 अधिकाऱ्यांसह अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लवकरच अयोध्येत महाराष्ट्र सदन भक्त निवास बांधणार असल्याचं स्पष्ट केलं.

Ravindra Chavan In Ayodhya
मंत्री रवींद्र चव्हाण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 11:59 AM IST

Updated : Jun 10, 2024, 12:30 PM IST

लखनऊ Ravindra Chavan In Ayodhya : आता रामभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी पुढं आली आहे. रामभक्तांना दर्शनासाठी अयोध्येत गेल्यावर अडचण होऊ नये, म्हणून महाराष्ट्र सरकार अयोध्येत महाराष्ट्र सदन भक्त निवास बांधणार आहे. महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी ग्रीन फिल्ड टाऊनशीपमध्ये विकास योजनेच्या माध्यमातून अडीच एकर जमीन घेण्यात आली आहे. या जागेच्या ताब्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आपल्या लवाजम्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह त्यांच्या विभागातील तब्बल 70 अधिकारी अयोध्येत पोहोचले आहेत.

रामनगरी अयोध्येत होणार महाराष्ट्र सदन : महाराष्ट्र सरकार अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार आहे. यासाठी अयोध्येच्या शेजारी असलेल्या ग्रीन फील्ड टाउनशिपमध्ये तब्बल अडीच एकर जमीन घेण्यात आली. यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह अयोध्येत धाव घेतली. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह त्यांचे 70 अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या सगळ्यांनी अगोदर रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सदन बांधण्यात येणाऱ्या जमिनीची पाहणी केली.

राम मंदिर ट्रस्टनं केलं जंगी स्वागत : महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण हे आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अयोध्येत दाखल झाले. यावेळी राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंपतराय यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाला अभिषेक करण्यात आला. आज रामलल्लाच्या दर्शनासाठी येण्याचं सौभाग्य लाभलं. तेही अशा वेळी जेव्हा, देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.

अयोध्येत अडीच एकर जमिनीवर बांधणार महाराष्ट्र सदन : "उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्येत राज्य भवन बांधण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रालाही निमंत्रण मिळालं. आज रामलल्लाचं दर्शन घेतलं. महाराष्ट्रातून लाखो भाविक अयोध्येत येतात. त्यामुळे अयोध्येत अडीच एकर जागेवर महाराष्ट्र सदन भक्त निवास बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळानं घेतला. राम मंदिरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाजवळ सरकारकडून जागा देण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आज आम्ही बांधकाम कामाशी संबंधित नियोजनाचा आराखडा घेऊन अयोध्येत आलो. आगामी 2 महिन्यात आम्ही हे काम सुरू करू. राज्य सरकार विकासकामं करत आहे, त्यात महाराष्ट्र सरकार आपलं योगदान देईल," असं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. "अयोध्यावासीयांबद्दल लाज वाटते", भाजपाचा पराभव दिसताच सोनू निगमची वादग्रस्त पोस्ट - Sonu Nigam controversial post
  2. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजानं मुलांसह अयोध्येत घेतलं श्रीरामाचं दर्शन, फोटो व्हायरल - riteish and genelia visit ayodhya
  3. माजी आयएएस अधिकाऱ्याकडून रामलल्लाच्या चरणी 5 कोटी रुपयांचं रामायण अर्पण, तब्बल सात किलो सोन्याची आहेत पाने! - GOLDen RAMAYANA

Last Updated : Jun 10, 2024, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.