ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता; आज दिल्लीत ठरणार रणनीती - Lok Sabha Election Result 2024 - LOK SABHA ELECTION RESULT 2024

Lok Sabha Election Result 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनडीए घटक पक्षाची दिल्लीत बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळानं लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली. तर दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा सोहळा 8 जूनला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Lok Sabha Election Result 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 2:35 PM IST

नवी दिल्ली Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली आहे. देशातही 'इंडिया' आघाडीनं मोठं यश मिलवलं. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी इंडिया आघाडीकडं पुरसं पाठबळ नाही. तरी मात्र 'इंडिया' आघाडीनं सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच दिल्लीत दाखल होत सत्ता स्थापन्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांचा शपथविधी 8 जूनला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एनडीए आणि 'इंडिया' आघाडी यांच्यात सत्ता स्थापन करण्यावरुन मोठी चुरस निर्माण झाली आहे.

लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस : लोकसभा निवडणूक निकाल 2024 घोषित झाल्यानंतर आज दिल्लीत एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सरकार स्थापन्याबाबत रणनीती आखण्यात येणार आहे. त्यामुळे आज एनडीएच्या बैठकीत कोणती रणनीती आखण्यात येते, याकडं नागरिकांचं लक्ष लागलं. मंत्रिमंडळानं लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झाल्यानंतर लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडं आज इंडिया आघाडीचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे घटक पक्ष दिल्लीत दाखल होत आहेत. महाराष्ट्रातून शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे हे दोघे इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार आहेत.

नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू दिल्लीत : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी दिल्लीत दाखल होत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यात या दोन्ही नेत्यांची भागीदारी महत्वपूर्ण मानली जात आहे.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात 18 सभा घेऊनही महायुतीचे 'हे' उमेदवार पराभूत, जाणून घ्या कारण - Maharashtra Lok Sabha results
  2. 'सत्तासोपान' गाठण्याकरिता इंडिया आघाडीसह एनडीए नेत्यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, जाणून घ्या संसदेमधील पक्षनिहाय बलाबल - INDIA Bloc Vs NDA
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरोप समारंभाची तयारी सुरू, इंडिया आघाडीच्या कलानंतर राऊतांचा 'एनडीए'ला टोला - Lok Sabha Election 2024 Results

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.