ETV Bharat / bharat

आजपासून प्रियंका गांधी घेणार अमेठी, रायबरेलीची सूत्रं हाती; दोन वॉररूममधून सुरू केलं काम - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : अमेठी लोकसभा मतदार संघात यावेळी काँग्रेसकडून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली. राहुल गांधी यांनी अमेठी मतदार संघातून माघार घेत रायबरेली मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आता या दोन्ही मतदार संघाच्या प्रचाराची कमान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी हाती घेतली आहे.

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र (Etv Bharat Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 11:55 AM IST

लखनऊ Lok Sabha Election 2024 : रायबरेली आणि अमेठी मतदार संघ हे काँग्रेसचे परंपरागत मतदार संघ आहेत. या मतदार संघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसनं अमेठीतून यावेळी गांधी घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी न देता किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर टाकण्यात आली आहे. आजपासून प्रियंका गांधी या अमेठी लोकसभा मतदार संघातील प्रचाराची धुरा संभाळत आहेत. प्रियंका गांधी वाड्रा या अमेठीत रोड शो देखील करणार आहेत.

Lok Sabha Election 2024
प्रियंका गांधी वाड्रा (Reporter)

किशोरीलाल शर्मा गांधी घराण्याचे विश्वासू : काँग्रेसनं किशोरीलाल शर्मा या अमेठी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदार संघ काँग्रेसचे परंपरागत मतदार संघ आहेत. मात्र काँग्रेसनं या लोकसभा निवडणुकीत बिगर गांधी घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली आहे. किशोरीलाल शर्मा हे गांधी घराण्याचे खास विश्वासू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातही अमेठी आणि रायबरेली मतदार संघात काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी काँग्रेसनं प्रियंका गांधी यांच्यावर सोपवली आहे.

अमेठी आणि रायबरेलीतील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी : प्रियंका गांधी वाड्रा यांनी किशोरीलाल शर्मा यांचा अर्ज सादर करताना प्रियंका गांधी वाड्रा यांनी आपण 6 मेपासून निवडणूक संपेपर्यंत अमेठी आणि रायबरेली इथं उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे प्रियंका गांधी वाड्रा या आजपासून अमेठी आणि रायबरेली इथं तळ ठोकून असणार आहेत. त्यांची लोकसभा मतदार संघातील उपस्थिती कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी मिळेल, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.

दोन वॉररुमची स्थापना : अमेठीतील काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्या प्रचारासाठी वॉररूम तयार करण्यात आली. तर रायबरेली मतदार संघातही एक वॉररूम तयार करण्यात आली. काँग्रेस नेते रवी शुक्ला यांनी "राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा अमेठीतून निवडणूक लढवत नाहीत. मात्र काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा हे 45 वर्षांपासून अमेठी आणि रायबरेलीमध्ये सेवक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याची आपली जबाबदारी वाढते. गांधी परिवाराचं रायबरेली आणि अमेठीचं नातं कधीच संपू शकत नाही."

हेही वाचा :

  1. आज सुटणार अमेठी, रायबरेलीचा तिढा; काँग्रेस जाहीर करणार उमेदवारी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना मिळणार संधी ? - Lok Sabha Election 2024
  2. गांधी कुटुंबाचे जावई बाप्पू उतरणार निवडणुकीच्या मैदानात; रॉबर्ट वाड्रा म्हणाले 'अनेक पक्षांच्या आहेत ऑफर' - Lok Sabha Election 2024
  3. काँग्रसच्या स्थापनादिनीच प्रियंका गांधींच्या अडचणींत वाढ; ईडीच्या चार्जशीटमध्ये नाव, नेमकं प्रकरण काय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.