नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या सत्रात देशातील दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातही आज मतदान होत आहे. देशातील 57 लोकसभा मतदार संघात आज सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
देशातील 57 मतदार संघात आज मतदान : लोकसभा निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक प्रचार संपला. आज आठ राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांतील तब्बल 57 लोकसभा मतदार संघात मतदान आहे. देशात लोकसभा निवडणूक 2024 साठी सात टप्प्यात मतदान होत आहे. आज उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये सर्वाधिक 13-13 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून रिंगणात : सातव्या टप्प्यात मतदान होत आहे, यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिसातील 6, हिमाचल प्रदेश 4 आणि झारखंडमधील 3 मतदार संघांचा समावेश आहे. यासोबतच सातव्या टप्प्यात चंदीगडच्या एका मतदार संघात मतदान होणार आहे. या 57 लोकसभा मतदार संघातून 904 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसनं अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.
उत्तर प्रदेशातील या लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत : उत्तर प्रदेशातील वाराणसी, महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगाव, घोसी, गाझीपूर, बलिया, सलेमपूर, चंदौली, मिर्झापूर, रॉबर्टसगंज या 13 जागांवर आज मतदान होत आहे. पंजाबमधील 13 जागांवर लोकसभा निवडणूक 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. यात गुरुदासपूर, अमृतसर, खादूर साहीब, जालंधर (SC), होशियारपूर (SC), आनंदपूर साहीब, लुधियाना, फतेहगढ साहीब (SC), फरीदकोट (SC), फिरोजपूर, भटिंडा, संगरूर, पतियाळा आदी मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे.
हेही वाचा :
- राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
- EXCLUSIVE: "...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्यावर"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत विरोधकांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं रोखठोक उत्तर - CM Eknath Shinde Interview
- निवडणूक निकालापूर्वीच नेत्यांची शिर्डीत साई दर्शनासाठी रीघ; साईबाबा कोणाला पावणार? - Political Leaders Sai Baba Darshan