हैदराबाद Lok sabha Election 5th phase : लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी आज (20 मे) 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 49 जागांसाठी मतदान होत आहे. या जागांसाठी 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 मे होती. आज उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3 आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान पार पडणार आहे.
Live updates
- आठ राज्यांमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.28 टक्के मतदान झालं
- बिहार: 8.86
- जम्मू आणि काश्मीर: 12.89
- झारखंड: 11.68
- लडाख: 10.51
- महाराष्ट्र : 6.33
- ओडिशा: 6.87
- उत्तर प्रदेश: 12.89
- पश्चिम बंगाल: 15.35
- अमेठी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणी केलं मतदान : उत्तर प्रदेशमध्ये मतदान केल्यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या की, आज मी भाग्यवान आहे की मी विकसित भारताचा संकल्प घेऊन गौरीगंज गावात मतदान केलं. मी जनतेला आवाहन करते की त्यांनी मतदानाचा हक्क बजवावा.
- दिलीप तिर्की यांनी केलं मतदान : ओडिशातील हॉकी इंडियाचे अध्यक्ष आणि सुंदरगड समाजवादी पक्षाचे उमेदवार दिलीप तिर्की म्हणतात की, मी सुंदरगडच्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी बाहेर जाऊन मतदान करावे. हा लोकशाहीचा उत्सव असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. ते म्हणाले की, येथील लोकांमध्ये मला प्रचंड उत्साह दिसत आहे. मी त्याला सांगू शकतो की येथे मतदानाची टक्केवारी चांगली असेल.
- भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी केलं मतदारांना आवाहन : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, अगोदर मी मंदिरात जाईन आणि नंतर माझं मत देईल. त्यानंतर मी माझ्या मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेट देईल. लोकशाहीत मतदान हा सण आहे आणि मला आशा आहे की सर्व मुंबईकर आपला मतदानाचा हक्क बजावतील.
- पाटणा, बिहार : LJP (राम विलास) प्रमुख आणि हाजीपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार चिराग पासवान यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "माझे वडील 1977 पासून हाजीपूरचे प्रतिनिधी आहेत. मला आशा आहे की माझ्या वडिलांना मिळालेलं लोकांचं प्रेम मलाही मिळेल. हाजीपूरचा विकास आणि माझ्या वडिलांचं नाव हाजीपूरचे समानार्थी शब्द आहेत.
- उत्तर प्रदेश : रायबरेलीचे भाजपाचे उमेदवार, दिनेश प्रताप सिंग यांनी रायबरेली येथील मतदान केंद्रावर मतदान केलं. काँग्रेसने राहुल गांधींना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
- लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केलं.
- पियुष गोयल यांनी केलं मतदान : केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार, पीयूष गोयल लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यात मतदान करण्यासाठी मुंबईतील मतदान केंद्रावर पोहोचले.
- उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांना सत्ता परिवर्तनाची आशा : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी लखनौमधील मतदान केंद्रावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. यावेळी सत्तेत बदल होणार का?, असं विचारलं असता, मायावती म्हणाल्या की, मला आशा आहे की यावेळी सत्तेत नक्कीच बदल होईल.
देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदानाला सुरुवात
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी तसंच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.
मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केलं : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जास्तीत जास्त संख्येनं मतदानात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, त्यांनी मतदान करावं. मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. लोकशाहीच्या या उत्सवात महिला आणि तरुण मतदारांनी उत्साहानं सहभागी व्हावं, असं माझं विशेष आवाहन आहे."
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज होणार मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट' - Lok Sabha Elections 5th Phase
- लोकसभा निवडणूक 2024 ; मतदानाची लगबग, साहित्य पोहोचू लागलं मतदान केंद्रांवर - LOKSABHA ELECTION
- अल्पसंख्यांकाच्या मतांसाठी ठाकरे गटाकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, किरण पावसकर यांचा गंभीर आरोप - Kiran Pavaskar Allegates