ETV Bharat / bharat

भाजपाची 13वी यादी जाहीर; रत्नागिरीत नारायण राणे यांना उमेदवारी, विनायक राऊतांशी रंगणार सामना - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कोकणात परंपरागत विरोधकांमध्ये थेट लढत होणार आहे.

Lok Sabha Election 2024
केंद्रीय मंत्री नारायण राणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 11:36 AM IST

Updated : Apr 18, 2024, 2:21 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : भाजपानं रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपानं आपली यादी आज जाहीर केली, या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात नारायण राणे यांचा विनायक राऊत यांच्याशी सामना रंगणार आहे. त्यामुळे कोकणातील राजकारणात दोन परंपरागत विरोधकांची लढत रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजपानं जाहीर केली 13 वी यादी : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या देशभरात रंगली आहे. लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी तयारी केली. मात्र जागा वाटपाचं घोडं अडल्यानं उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत अनेक नेत्यांना साशंकता होती. असं असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्यालाच महायुतीची उमेदवारी मिळणार असा दावा केला होता. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना आव्हान दिलं होतं. महाविकास आगाडीचे नेतेही नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचा दावा करत होते. अखेर भाजपानं नारायण राणे यांनाच उमेदवारी बहाल केल्यानं नारायण राणे यांचा दावा खरा ठरला. भाजपानं आपली 13 वी यादी जाहीर करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये रंगणार सामना : लोकसभा निवडणूक 2024 च्या उमेदवारीवरुन राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता भाजपानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सि्धुदुर्ग मतदार संघातून उमेवारी जाहीर केली. त्यामुळे कोकणातील परंपरागत कट्टर शत्रू असलेले विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे.

हेही वाचा :

  1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपाच्या 'नारायण'अस्त्रासमोर शिंदेंच्या आशेचा 'किरण' मावळला - Kiran Samant
  2. विनायक राऊतांचं डिपॉझिट जप्त करणार; नारायण राणे यांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  3. कोकणातील प्रकल्पांना उद्धव ठाकरेंचा विरोध का? नारायण राणेंचा गंभीर आरोप - Narayan Rane

Last Updated : Apr 18, 2024, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.