ETV Bharat / bharat

'भारतरत्न' लालकृष्ण अडवाणी! भाजपाच्या 'भीष्माचार्यां'ना रथयात्रा पावली

Bharat Ratna Lal Krishna Advani : ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली.

Lal Krishna Advani
Lal Krishna Advani
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 11:47 AM IST

Updated : Feb 3, 2024, 12:03 PM IST

नवी दिल्ली Bharat Ratna Lal Krishna Advani : ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत याची माहिती दिली.

मोदींनी भेटून अभिनंदन केलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, अडवाणी जी यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिलंय. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचं जीवन सुरू होतं. गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचं संसदीय कार्य नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेलं आहे."

अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात राहिले : मोदींनी पुढे लिहिलं की, "अडवाणी जी यांची सार्वजनिक जीवनातील अनेक दशकं चाललेली सेवा पारदर्शकता, सचोटी आणि त्यांच्या अटल वचनबद्धतेसाठी ओळखली जाते. त्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना भारतरत्ननं सन्मानित करणं हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मिळाल्या हे मी नेहमीच माझं भाग्य समजतो."

भाजपाचे सर्वाधिक काळ अध्यक्ष : लालकृष्ण अडवाणी, 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून सर्वात जास्त काळ पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. ते पहिल्यांदा 1986 ते 1990 आणि नंतर 1993 ते 1998 पर्यंत अध्यक्ष होते. त्यानंतर ते 2004 ते 2005 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहिले. खासदार म्हणून 3 दशकांची प्रदीर्घ इनिंग खेळल्यानंतर अडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर अटलजींच्या मंत्रिमंडळात (1999-2004) उपपंतप्रधान बनले.

हे वाचलंत का :

  1. मागासवर्गीयांसाठी लढणारे कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर

Last Updated : Feb 3, 2024, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.