ETV Bharat / bharat

केंद्रानं घेतली डॉक्टर संघटना संपाची दखल; कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल प्रत्येक दोन तासाला द्या - गृह मंत्रालय - Kolkata Doctor Rape Murder Case - KOLKATA DOCTOR RAPE MURDER CASE

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्यानं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या निषेधार्थ देशभारतील डॉक्टर संपावर गेले आहेत. आता या प्रकरणाची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे.

Kolkata Doctor Rape Murder
डॉक्टर तरुणी खून बलात्कार प्रकरण (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 9:48 AM IST

नवी दिल्ली/कोलकाता Kolkata Doctor Rape Murder Case : डॉक्टरांच्या संपामुळं अनेक राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याबाबत केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. सर्व राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्थेवर केंद्र सरकार आता लक्ष ठेवणार आहे. यासाठी गृह मंत्रालयानं शनिवारी (17 ऑगस्ट) आदेश जारी केला.

केंद्रानं मागवला अहवाल : कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेवरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध राज्यातील डॉक्टर संघटना संपावर गेल्या आहेत. त्यामुळं वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची आता केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली.

प्रत्येक दोन तासाला अहवाल द्यावा लागेल : यासाठी गृह मंत्रालयानं शनिवारी (17 ऑगस्ट) आदेश जारी केला. सर्व राज्यांनी दर दोन तासांनी कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती केंद्राला द्यावी लागेल. त्यामुळं आतापासून सर्व राज्य दर दोन तासांनी परिस्थितीचा अहवाल गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फॅक्स, ई-मेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवतील, असं गृह विभागानं आदेशात म्हटलं आहे. केंद्रानं शुक्रवारी (16 ऑगस्ट) दुपारी 4 वाजेपासून या आदेशाची अंमलबजावणी केली आहे.

प्रकरण सीबीआयकडं सोपवलं : गृह मंत्रालयानं राज्य पोलीस दलांना फॅक्स, व्हॉट्सॲप क्रमांक आणि ईमेल आयडी देखील प्रदान केले आहेत. त्याठिकाणी प्रत्येक दोन तासांचा आढावा राज्यांना केंद्राला पाठवायचा आहे. 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असताना एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोलकाता उच्च न्यायालयानं मंगळवारी हे प्रकरण सीबीआयकडं सोपवलं.

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा संप : डॉक्टर तरुणी बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टर सध्या संपावर गेले आहेत. आज (18 ऑगस्ट) देखील विविध डॉक्टरांच्या संघटनांनी संप पुकारला आहे. देशाच्या विविध भागात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी आंदोलन करत असून, आरोग्य सुविधांच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

हेही वाचा -

  1. डॉक्टरच नव्हे तर देशातील महिलाही सुरक्षित नाहीत, पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांचा संताप शिगेला - Pune Doctors Protest
  2. कोलकाता घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा संप, जिल्ह्यातील आरोग्य सेवा एक दिवस बंद - Doctors strike in Sambhajinagar
  3. पुण्यात 20 हजार डॉक्टर संपावर, आरोग्यसेवा कोलमडली - Doctors strike in Pune

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.