ETV Bharat / bharat

5 एमबीबीएसचे विद्यार्थी अपघातात ठार; एकाच कारमधून करत होते 11 जण प्रवास, बसला दिली धडक - MBBS STUDENT DIED IN ACCIDENT

केरळमधील वैद्यकीय महाविद्यालयाचे 5 विद्यार्थी कार आणि बसच्या अपघातात ठार झाले. या कारमध्ये तब्बल 11 विद्यार्थी प्रवास करत होते. मुसळधार पावसामुळे अपघात झाल्याची शक्यता आहे.

MBBS Student Died In Accident
अपघातग्रस्त कार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2024, 12:21 PM IST

तिरुअनंतरपूरम : वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कार आणि बसच्या भीषण धडकेत 5 भावी डॉक्टरांचा मृत्यू झाला. ही घटना कालारकोडे इथल्या चांगनासेरी जंक्शनच्या उत्तरेला 100 मीटर अंतरावर सोमवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली. देवनांथन (19, रा. कोट्टाक्कल, मलप्पुरम ), श्रीदेव वलसन (19 सेखारीपुरम पलक्कड ), आयुष शाजी (19, चेन्नाडू, कोट्टायम ) , पीपी मोहम्मद इब्राहिम (19, आंद्रोथ, लक्षद्वीप ) , मोहम्मद अब्दुल जब्बार (19, पंड्याला कन्नूर ) अशी मृतांची नावं आहेत. कारमध्ये तब्बल 11 प्रवासी प्रवास करत होते, त्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं हा अपघात घडल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू : वंदनम इथल्या टीडी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी भरधाव कारनं सोमवारी रात्री जात होते. मुसळधार पाऊस सुरू असताना या विद्यार्थ्यांनी आपली कार भरधाव वेगात नेली. यावेळी त्यांची कार आणि केआरटीसी परिवहन विभागाच्या बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील तब्बल 15 प्रवासी गंभीर जखमी झाले. तर कारमधील एका विद्यार्थ्याचा घटनास्थळीच, तर इतर चौघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या कारमध्ये तब्बल 11 विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती विभागीय परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या कारचा अपघात झाला असावा, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

बसच्या खाली कारचा चक्काचूर : कालारकोडे इथल्या चांगनासेरी जंक्शनच्या उत्तरेला 100 मीटर अंतरावर रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. बस कंडक्टर मनीषनं सांगितलं, की "बसला धडकण्यापूर्वी कार प्रचंड वेगात येत होती. भरधाव कार बसवर येऊन आदळल्यानंतर या धडकेनं बसच्या खाली कारचा चक्काचूर झाला. इतर वाहनांतील प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ बचावकार्य करत जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केलं. काही तरुण कारमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी कारचा पत्रा कापून त्यांची सुटका करण्यात आली." "या धडकेमुळे कारचा संपूर्ण चक्काचूर झाला. गाडीच्या काचा फोडून आतील तरुणांना बाहेर काढण्यात आलं. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले," अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरुवायूरहून कायमकुलमला जाणाऱ्या केएसआरटीसीच्या बसला कारनं धडक दिली. या धडकेमुळे समोरची खिडकी तुटल्यानं बसमधील प्रवासी बसमधून बाहेर फेकले गेले. बसमधील 15 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्या त्यांच्या दुखापती गंभीर नाहीत, अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात : कारची पिकअपला धडक - Sanjay Rathode Car Accident
  2. समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; स्विफ्ट आणि अर्टिगाची समोरासमोर धडक, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Samruddhi Highway Accident
  3. बस-कारचा भीषण अपघात; आगीनं पेट घेतल्यानंतर कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू - Nashik Car Bus Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.