रुद्रप्रयाग (उत्तराखंड) Kedarnath Route Pilgrims Died : केदारनाथच्या पायी मार्गावर दगड आणि मलबा पडल्यानं तीन यात्रेकरूंचा मृत्यू झालाय. तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत. केदारनाथ पादचारी मार्गावरील चिरबासा येथे हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
बचाव कार्य सुरू : या घटनेची अधिक माहिती देत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितलं की, "केदारनाथ यात्रेच्या मार्गावर चिरबासाजवळील टेकडीवरून मोठे दगड पडल्याची माहिती सकाळी साडेसातच्या सुमारास आपत्ती नियंत्रण कक्षाला मिळाली. काही प्रवासी ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआरएफ, वायएमएफ आणि प्रशासनाच्या पथकांसह यात्रा मार्गावर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सध्या या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे."
केदारनाथ यात्रा मार्ग के पास पहाड़ी से मलबा व भारी पत्थर गिरने से कुछ यात्रियों के हताहत होने का समाचार अत्यंत दुःखद है। घटनास्थल पर राहत एवं बचाव कार्य जारी है, इस सम्बन्ध में निरंतर अधिकारियों के संपर्क में हूं। हादसे में घायल हुए लोगों को त्वरित रूप से बेहतर उपचार उपलब्ध…
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) July 21, 2024
मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश : या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी दोघं महाराष्ट्रातील तर एक रुद्रप्रयागचा होता. हे सर्व लोक केदारनाथ धामच्या दिशेनं जात होते. तर काही जखमी प्रवाशांची प्रकृतीदेखील चिंताजनक आहे. अपघातस्थळी प्रशासनानं दोन्ही बाजूनं सुरक्षा कर्मचारी तैनात केलेत.
मृतांची नावं :
- किशोर अरुण (वय 31 वर्षे), रा. नागपूर, महाराष्ट्र
- सुनील महादेव (वय 24 वर्षे), रा. जालना, महाराष्ट्र
- अनुराग बिष्ट, (रा. तिलवाडा, रुद्रप्रयाग, उत्तराखंड)
जखमींची नावं :
- चेला भाई चौधरी, रहिवासी- गुजरात
- जगदीश पुरोहित, रहिवासी- गुजरात
- अभिषेक चौहान, रहिवासी- महाराष्ट्र
- धनेश्वर दंडे, रहिवासी- नागपूर, महाराष्ट्र
- हरदान भाई पटेल, रहिवासी- गुजरात
मुसळधार पावसाचा इशारा- हवामान खात्यानं उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत डोंगरावर दगड कोसळल्यानं नदी-नाले ओसंडून वाहण्याचा धोका वाढलाय. त्यामुळं पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गौरीकुंड येथे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही अशीच मोठी दुर्घटना घडली होती. यावेळी डोंगर कोसळल्यानं तीन दुकानं जमीनदोस्त झाली. या अपघातात अनेकांचा बळी गेला होता. तर अनेक लोक बेपत्ताही झाले होते.
हेही वाचा -