ETV Bharat / bharat

तब्बल 39 वर्षानंतर बिग बी-कमल हासन एकत्र, 'कल्की 2898 एडी'ला मुंबईतील प्रेक्षकांची पसंती - Kalki 2898 AD

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 10:10 AM IST

Updated : Jun 28, 2024, 11:34 AM IST

Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी' चित्रपट कालचं प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला असून चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याचं चित्र आहे. मुख्य म्हणजे तब्बल 39 वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि कमल हासन या दिग्गजांनी चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

Kalki 2898 AD
कल्की 2898 निमित्ताने 39 वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि कमल हासन एकत्र (ETV Bharat Reporter)

हैदराबाद Kalki 2898 AD: 'कल्की 2898 एडी' प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. हा सिनेमा मुंबईत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. "फर्स्ट डे फर्स्ट शो" बघितल्यानंतरदेखील पुन्हा सायंकाळी पाहण्यासाठी आल्याचं एका चाहत्यानं ईटीव्ही भारती बोलताना सांगतिलं आहे. तब्बल 39 वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि कमल हासन या चित्रपटात एकत्र आल्यांनं चाहते खूश आहेत. चाहत्यांनी पहिल्याच दिवशी चित्रपट बघण्याकरता रांगा लावल्या आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे शो हाऊसफुल पहायला मिळाले.

kalki 2898 ad movie audience voxpop (Source- ETV Bharat Reporter)

बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये जुळते सूत: बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये सूत जुळल्याचे दिसून येते. एकमेकांशी संबंध न ठेवणाऱ्या या फिल्म इंडस्ट्रीज आता हातात हात घालून कामं करू लागल्या आहेत. बॉलिवूडच्या चित्रपटांत दाक्षिणात्य सिनेमातील पॉप्युलर कलाकार आणि साऊथच्या फिल्म्समध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश कलाकार घेतले जात आहेत. या चित्रपटांना पॅन-इंडियाचा दर्जा दिला असून त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या मिळकतीवर पॉझिटिव्ह परिणाम झालेला दिसतोय. गुरुवारी प्रदर्शित झालेला चित्रपट कल्की 2898 AD हे ताजे उदाहरण आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आदी कलाकार काम करीत आहेत.

अमिताभ अश्वत्थामाच्या भूमिकेत : कल्की 2898 AD मध्ये अमिताभ बच्चन अमर अश्वत्थामाची भूमिका करत आहे. तर कमल हासननं सुप्रीम यास्किनची भूमिका केली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने सुमतीची भूमिका साकरली आहे. चित्रपटाचा पहिला शो अमेरिकेतील एका थिएटरमध्ये पार पडला. चित्रपटाची कथा कुरुक्षेत्रामध्ये सुरू होते. भारतात अ‍ॅडवान्स बुकींगच्या माध्यमातून जवळपास 19 लाख तिकीटांची विक्री झाली आहे. तसंच पहिल्याचं दिवशी चित्रपट 200 कोटींची कमाई करणण्यात यशस्वी ठरला आहे. आतपर्यत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम 'आरआरआर' चित्रपटाच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर प्रभासचा चित्रपट 'बाहुबली २' आहे. 'आरआरआर' चित्रपटनं पहिल्या दिवशी 223.5 कोटींची कमाई करत विक्रम गाजवलं होतं.

हेही वाचा

  1. 'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरूवात, पाहा कमाई - kalki 2898 ad box office day 1
  2. यूके ते हैदराबादपर्यंत 'कल्की 2898 एडी' रिलीजसह प्रभासचा ज्वर वाढला - Kalki 2898 AD Release
  3. 'कल्की 2898 एडी' पाहण्यासाठी एसएस राजामौलीनं सामान्य प्रेक्षकांसह लावली हजेरी, व्हिडिओ व्हायरल - SS Rajamouli

Last Updated : Jun 28, 2024, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.