अयोध्या (उत्तर प्रदेश) Ayodhya Ram Mandir Threat : दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. सोशल मीडियावर धमकी प्रकरणाचा एक ऑडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये राम मंदिर बॉम्बनं उडवणार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व प्रकारानंतर राम मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर यूपी पोलीस आणि एटीएससह केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 'ईटीव्ही भारत' या ऑडिओची पडताळणी करत नाही.
धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल : शुक्रवारी सोशल मीडियावर एक ऑडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रामजन्मभूमीवर बोलत आहे. ऑडिओमध्ये जैशचा दहशतवादी म्हणत आहे की, "आमची मशीद हटवून मंदिर बांधले आहे, आता बॉम्बस्फोट होणार आहेत. आमच्या तीन साथीदारांचे बलिदान झाले असून, आता हे मंदिर पाडावे लागेल." हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली. राम मंदिरासह अयोध्येची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अयोध्येत सुरक्षा वाढवली : 2005 मध्ये रामजन्मभूमी संकुलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे नाव पुढे आले होते. रामजन्मभूमीबाबत जैश सातत्यानं धमकी देत आहे. प्राणप्रतिष्ठापूर्वीही या दहशतवादी संघटनेनं धमकी दिली होती. मात्र, याबाबत अद्याप यूपी पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आले नाही.
सुरक्षा यंत्रणा वाढवली : राम मंदिर बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर अयोध्या अलर्ट मोडवर आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळासह महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. एसएसपी राज करण नय्यर यांनी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अयोध्येच्या सुरक्षेबाबत एसएसपी म्हणाले की, अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था वेगवेगळ्या भागात विभागण्यात आली असून, वरिष्ठ राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली आहेत.
हेही वाचा - आता रामभक्तांसाठी खुशखबर; अयोध्येत होणार महाराष्ट्र सदन, मंत्री रवींद्र चव्हाणांनी केली जागेची पाहणी