ETV Bharat / bharat

आता स्थापन होणारं सरकार हे युतीचं सरकार असेल, कशाप्रकारे असू शकतं भाजपा युतीचं सरकार? - LOK SABHA ELECTION RESULTS 2024

LOK SABHA ELECTION RESULTS 2024 : भाजपानं ठरवल्याप्रमाणं लोकसभेत 400 जागा जिंकल्या नाही. परिणामी आता स्थापन होणारं सरकार हे युतीचं सरकार असेल. त्यामुळं बहुमत मिळविण्यासाठी नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि जयंत चौधरी यांसारख्या तीन धर्मनिरपेक्ष मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागेल. वाचा यासंदर्भातील संजय कपूर यांचा माहितीपूर्ण लेख.

संग्रिहत छायाचित्र
संग्रिहत छायाचित्र (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 6:35 PM IST

Updated : Jun 5, 2024, 6:42 PM IST

हैदराबाद LOK SABHA ELECTION RESULTS 2024 : भारतीय जनता पक्षानं ठरवल्याप्रमाणे लोकसभेत 400 जागा जिंकल्या नाहीत. परंतु तरीही ते दिल्लीत सरकार स्थापन करतील. आता स्थापन होणारं एनडीएचं सरकार हे गेल्या 10 वर्षात देशानं जे काही पाहिलं त्यापेक्षा अनेक अर्थांनी वेगळं असेल. सर्वप्रथम, हे भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत युतीचं सरकार असेल, जे स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी अद्याप 33 जागांनी कमी आहे. दुसरं म्हणजे, बहुमत मिळविण्यासाठी नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि जयंत चौधरी यांसारख्या तीन धर्मनिरपेक्ष मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागेल आणि महत्वाच म्हणजे सरकारला एक समान किमान कार्यक्रम तयार करावा लागेल.

या लोकसभा निवडणुकीत केवळ 400 जागा जिंकण्याचंच नव्हे, तर 2047 पर्यंत सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहात असताना भाजपा या अत्यंत निराशेच्या परिस्थितीत कशी पोहोचली? निवडणुका आणि लोकशाही या दोन्ही बाबींनी यातून एक गोष्ट अधोरेखित केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनं त्यांना त्यांच्या सरकार बनवण्यासाठी धावपळ करायला भाग पाडलं आहे. ज्यामुळं त्यांनी ज्या क्षेत्रांसाठी सौदेबाजी केली नाही, तिथं त्यांना धक्का बसला. उत्तर प्रदेश राज्य हे त्यातलंच उदाहरण आहे. अगदी राष्ट्राच्या प्रमुख पदासाठी मोहीम राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशिवाय कोणीही स्पर्धेत नसल्यासारखे वागले. पक्षाच्या अन्य उमेदवाराला महत्त्व दिलं नाही. हे टोकाचं मत मतदारांना रुचलं नाही. त्यांनी उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघातील कामगिरीनुसार न्याय दिला. भाजपानं अनेक खासदार बदलले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. यापैकी काही उमेदवारांना बाहेरचं मानलं गेलं आणि त्यांना अपेक्षेप्रमाणं पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश हे भाजपासाठी देखील महत्त्वाचं होतं. कारण तिथे पक्षाला सत्तेवर आणलेल्या धार्मिक वादांना घर केलं होतं.

भाजपा यूपीवरील नियंत्रण गमावत असल्याचे अनेक पुरावे होते. पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये सर्वत्र कटुता दिसून आली. तेथील समर्थक लोकही पीएमवर ताशेरे ओढत होते. पंतप्रधानांबद्दलचा आदर किंवा भीती दूर झाल्याचं उघड होतं. वाराणसीमध्ये मोदींच्या उपस्थितीमुळं भाजपा पूर्व उत्तर प्रदेशात 13 जागा जिंकेल, अशी अपेक्षा होती. रायबरेली आणि अमेठी जिंकण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका यांनी जोरदार प्रचार केला. त्यांच्या मोहिमेचा मोठा फटका स्मृती इराणी यांना बसला. त्यांना गांधीजींचे समर्थक किशोरी लाल शर्मा यांच्याकडून अपमानास्पद पराभव पत्करावा लागला. राहुल गांधी यांनी रायबरेलीत मोठ्या फरकानं विजय मिळवला. त्या तुलनेत मोदी वाराणसीतून विजयी झाले, पण एक लाख मतांच्या कमी फरकानं. राजस्थानमध्ये भाजपाने अनेक जागा गमावल्या. जर भाजपा 240 जागांवर टिकू शकला असेल तर त्याचं कारण आहे, भाजपाची ओडिशामध्ये चांगली कामगिरी. जिथं ते राज्य सरकार बनवू शकतात आणि अपेक्षितपणे गुजरात आणि दिल्लीतही त्यांनी चांगली कामगिरी केली. परंतु, या प्रक्रियेत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाला पूर्णपणे अपयश आलं. आगामी काळात 'आप' राजकीय पटलावरुन गायब होऊ शकते, अशी परिस्थिती दिसली. या सरकारनं दिलेल्या बनावट स्थैर्याचा क्षय झालाय आणि इतरांच्या पाठिंब्यानं धर्मनिरपेक्षतेची परतफेड हे येत्या काही दिवसांत आपण पाहू शकतो.

हेही वाचा :

  1. लोकांच्या मनात पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी; आजच्या बैठकीत सरकार स्थापनेच्या दाव्याबाबत रणनीती ठरवणार : शरद पवारांचा मोठा दावा
  2. नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता; आज दिल्लीत ठरणार रणनीती

Last Updated : Jun 5, 2024, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.