नवी दिल्ली Indian Navy Rescues Pakistanis : भारतीय नौदलानं अरबी समुद्रात 12 तासांच्या धाडसी ऑपरेशनमध्ये 23 पाकिस्तानी नागरिकांना सोमाली चाच्यांच्या तावडीतून सुखरुप (Somali Pirates in Arabian Sea Operation) वाचवलंय. 29 मार्च रोजी हे ऑपरेशन (Somali Pirates) राबवण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या युद्धनौका INS सुमेधानं 'FV अल-कंबर' हे अपहरण केलेलं जहाज अडवलं, तेव्हा ही कारवाई सुरू झाली.
भारतीय नौदलाची मोठी कारवाई : अरबी समुद्रात पाकिस्तानी जहाज चाच्यांनी ताब्यात घेतलं होतं. याची माहिती मिळताच INS सुमेधा ही युद्धनौका क्षेपणास्त्र फ्रिगेट INS त्रिशूलसह ऑपरेशनसाठी रवाना झाली होती. कौशल्य आणि समन्वयानं भारतीय नौदलाच्या जवानांनी समुद्री चाच्यांशी वाटाघाटी सुरू केली. अखेर हे चाचे भारतीय नौदलाला शरण आले.
समुद्री चाच्यांना शिकवला धडा : भारतीय नौदलाच्या या कारवाईनं समुद्री चाच्यांना पुन्हा एकदा दाखवून दिलंय की भारतावर वाकडी नजर जर टाकाल तर गाठ आमच्याशी आहे. समुद्री चाच्यांना यशस्वीपणे पकडल्यानंतर, भारतीय नौदलाच्या पथकांनी समुद्री सुरक्षेचा आढावा घेतला. तसंच या सर्व भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.
भारतानं सोडवलं पाकिस्तानी जहाज : पाकिस्तानी जहाज हे मासे पकडण्यासाठी अरबी समुद्रात आलं होतं. यावेळी या जहाजाचा ताबा हा समुद्री चाच्यांनी घेतला होता. याबाबतची माहिती भारतीय नौदलाला मिळाली आणि सुरू झालं 'ऑपरेशन अरब'. भारतीय नौदलाच्या जवानांपुढं चाचे नरमले आणि ते शरण आले. यानंतर हे जहाज आणि त्यावरील 23 पाकिस्तानी नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली.
हेही वाचा -