मुंबई Indian Navy Airlifts Chinese Mariner : गंभीर जखमी झालेल्या चीनच्या नाविकाला भारतीय नौदलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून बचावलं आहे. मुंबईजवळील समुद्रात भारतीय नौदलाच्या जवानांनी बुधवारी या चीनच्या नागरिकांला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावली. यावेळी चीनी नाविकाला भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरनं एयर स्टेशनवर नेण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली.
#IndianNavy successfully evacuates a Critically injured #Chinese Mariner from Bulk Carrier ZHONG SHAN MEN, 200nm (approx 370km) from #Mumbai.
— SpokespersonNavy (@indiannavy) July 24, 2024
Maritime Rescue Co-ordination Centre, Mumbai received a distress call on PM #23Jul 24 from the bulk carrier reporting heavy blood loss… pic.twitter.com/FyhlgnEUUR
गंभीर जखमी झाला होता नाविक : भारतीय नौदलाच्या मेरिटाइम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर (एमआरसीसी) इथं 51 वर्षीय चीनी नाविक गंभीर जखमी झाल्यानं त्याला तत्काळ मदतीची गरज असल्याची माहिती देण्यात आली. या नाविकाला तत्काळ एयरलिफ्ट करण्याची विनंती यावेळी चीनी नाविकांनी केली. त्यामुळे भारतीय नौदलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत या नाविकाला बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवण्यात आली. या नाविकाला गंभीर दुखापत झाल्यानं त्याच्या शरीरातील रक्त कमी झाल्याची तक्रार नाविकांनी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांकडं केली. त्यामुळे या नाविकाला तत्काळ सुरक्षित बाहेर न काढल्यास त्याच्या जीवाचा धोका वाढला होता.
जहाजाच्या ब्रिज विंगवरून करण्यात आलं एअरलिफ्ट : मेरिटाइम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर (एमआरसीसी) मुंबईनं ही माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मंगळवारी मुंबईपासून चीनी जहाज 'झोंग शान मेन' 200 एनएम (अंदाजे 370 किमी) यावर एक चीनी नाविक गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ मदतीची गरज होती. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणीला प्रतिसाद देत भारतीय नौदल हवाई स्टेशन INS शिक्रा इथून पहाटे 5.50 वाजता एक सीकिंग हेलिकॉप्टर चीनी नाविकाच्या मदतीला पाठवण्यात आलं. 45 नॉट्सपेक्षा जास्त वारं वाहत असल्यानं रुग्णाला बाहेर काढणं मोठं आव्हान होतं. जहाज जड रोल अनुभवत होत, तर डेकवर स्पष्ट क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे जवानांना जीवाची बाजी लावून रुग्णाला जहाजाच्या ब्रिज विंगवरून यशस्वीरित्या एअरलिफ्ट करण्यात आलं," असं नौदलाच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे याच परिसरात असलेलं ICGS सम्राट यालाही मदतीसाठी वळवण्यात आलं. एमआरसीसी (एमबीआय) नं भारतीय नौदलासोबत केलेल्या या संयुक्त ऑपरेशनमुळे रुग्णाला सुरक्षित आणि वेळेवर बाहेर काढण्यात यश आलं, असं नौदलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
हेही वाचा :
- कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय नौदलानं घडवलं माणुसकीचं दर्शन - Indian Navy Rescues Pakistanis
- Red Sea Crisis : भारतीय नौदलाच्या कारवाईमुळं समुद्री डाकू हादरले, भारतीय नौदलाचं जगभरातून कौतुक - Red Sea Crisis
- इराणी मासेमारी बोट समुद्री चाच्यांनी केली हायजॅक, भारतीय नौदलाने केली पाकिस्तानी नागरिकांची सुटका, नऊ आरोपींना अटक - Indian Navy