ETV Bharat / bharat

बनावट प्रमाणपत्र प्रकरणात पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव, काय झाला निर्णय? - IAS Pooja Khedkar updates - IAS POOJA KHEDKAR UPDATES

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणावर न्यायालयात आज सुनावणी झाली आहे. न्यायालयानं निकाल राखीव ठेवला आहे.

IAS Pooja Khedkar updates
पूजा खेडकर दिल्ली कोर्ट सुनावणी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 8:43 AM IST

Updated : Jul 31, 2024, 2:26 PM IST

नवी दिल्ली : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या आएएसमधील निवड ते प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात पडल्या आहेत. थेट यूपीएससीनं त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिल्यानंतर बनावट प्रमाणपत्र प्रकरणात दिल्ली गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणात अटक होऊ नये, याकरिता पूजा खेडकर यांनी आता न्यायालयाची पायरी चढली आहे.

पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीनकरिता अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी (30 जुलै) सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी वकिलांनी आणखी वेळ मागितल्यानं एक दिवस सुनावणी पुढे ढकलली. न्यायालयानं खेडकर प्रकरणात निकाल राखीव ठेवला आहे.

काय आहेत आरोप? प्रशिक्षणार्थी म्हणून खेडकर यांनी काम करताना बेकायदेशीर मागण्या केल्याचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला पाठविला. त्यानंतर पूजा खेडकर यांच्या संदर्भात विविध प्रकरणे एकामागून एक समोर आली आहेत. 2023 बॅचच्या आएएस पूजा खेडकर यांच्यावर सत्तेचा गैरवापर करणे, बनावट प्रमाणपत्राद्वारे आरक्षणाचा लाभ घेणे, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे आणि खासगी वाहनावर लाल अंबर दिवा लावणे असे विविध आरोप आहेत.

काय कारवाई सुरू- खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याकरिता केंद्र सरकारनं एक सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीनं 27 जुलैला केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला. खेडकर यांच्यावरील गंभीर आरोप पाहता राज्य सरकारनं त्यांच राज्यातील प्रशिक्षण थांबविलं. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीनं (LBSNAA) त्यांनानोटीस बजावित 23 जुलैला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, त्या 23 जुलैला मसुरी येथ हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर अचानकपणे दिल्ली जाऊन अटकपूर्व जामिनसाठी धडपड सुरू केल्याची माहिती समोर आली. दुसरीकडं पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकाविल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. न्यायालयाच्या हजर केल्यानंतर मनोरमा खेडकर यांची येरवडा येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा-

  1. पूजा खेडकर अजूनही 'नॉट रिचेबल'; चौकशीला राहिल्या गैरहजर, कारवाई होण्याची शक्यता - IAS Pooja Khedkar Case
  2. पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? आयएएस पदावरून काढण्याकरिता 'हे' आहेत नियम - IAS POOJA KHEDKAR CASE

Last Updated : Jul 31, 2024, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.