रांची Howara CSMT Express Derailed : हावडावरुन मुंबईला येणारी रेल्वे गाडी रुळावरुन घसरल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात सहा प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना चक्रधरपूरजवळ राजखर्सवान वेस्ट आऊटर आणि बारांबू दरम्यान आज पहाटे 03.45 वाजताच्या सुमारास घडली. हावडा - सीएसएमटी एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याची माहिती मिळताच एडीआरएम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.
हावडा-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस रुळावरुन घसरली : झारखंडमध्ये हावडा-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. हावडा-मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरुन हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चक्रधरपूर विभागातील बारांबू -राजखर्सवान रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहती सूत्रांनी दिली आहे, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
Jharkhand: Train No. 12810 Howara-CSMT Express derailed near Chakradharpur, between Rajkharswan West Outer and Barabamboo in Chakradharpur division at around 3:45 am. ARME with Staff and ADRM CKP on site. 6 persons have been injured. All have been given first aid by the Railway… pic.twitter.com/dliZBvtoFk
— ANI (@ANI) July 30, 2024
अपघातात अनेक प्रवासी झाले जखमी : हावडा-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस क्रमांक 12810 या रेल्वे गाडीचा मंगळवारी पहाटे हावडा-मुंबई मार्गावरील चक्रधरपूर विभागातील पोटो बेडा गावाजवळ अपघात झाला. रेल्वेचे चार सर्वसाधारण डबे वगळता इतर सर्व डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती घटनास्थळीवरील सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळावर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
Jharkhand train derailment | 80 percent of passengers transshipped to Chakardharpur station by bus. One rescue train also reached at site to clear the rest of the passengers. Passengers arrived at CKP Railway station (Chakardharpur): Indian Railways
— ANI (@ANI) July 30, 2024
(Pics: Indian Railways) pic.twitter.com/fKO8WG1GgF
रेल्वेकडून तातडीनं मदत आणि बचावकार्य सुरू : हावडा सीएसएमटी रेल्वे गाडी रुळावरुन घसरल्याची माहिती मिळताच सरायकेला-खरसावनचे उपायुक्त रविशंकर शुक्ला घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वेकडून तातडीनं मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जखमींना चक्रधरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेच्या वेळी रेल्वेतील बहुतांश प्रवासी झोपले होते. या घटनेनंतर काही जण डब्यातून बाहेर पडले, तर काही तिथंच अडकले. मात्र रेल्वे अपघाताचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
- चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानं डबे उलटले, चार प्रवाशांचा मृत्यू - Chandigarh Dibrugarh Train Derailed
- अश्विनी वैष्णव यांच्या कार्यकाळात 131 रेल्वे अपघात, प्रभावी उपाययोजना करण्याची प्रवासी संघटनेची मागणी - TRAIN ACCIDENTS RTI
- दार्जिलिंगमध्ये भीषण रेल्वे अपघात; कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक, 15 प्रवाशांचा मृत्यू - Kanchenjunga Express Accident