ETV Bharat / bharat

इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद'चे नाव ऐकून शत्रुंना भरते धडकी, कसे काम करते? - Mossad carried out Assassinations - MOSSAD CARRIED OUT ASSASSINATIONS

Mossad : हमासचा प्रमुख हानियाचा तेहरानमधील हल्ल्यात मृत्यू झाला. यामागं इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचं नाव घेतलं जात आहे. कारण अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये मोसादनं आजवरच्या महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

Mossad
मोसाद (AI Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 6:35 PM IST

हैदराबाद Mossad : तेहरानमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात हमास या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेला इस्माईल हनीयेह ठार झाला. एका अहवालांनुसार, इस्रायलची गुप्तचर संस्था त्यांच्या मागावर होती. त्यातूनचं इस्रायलनं हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. तेहरानमधील त्यांच्या राहत्या घरी आंघोळ करत असताना हत्या झाली. त्यांच्या घरावर क्षेपणास्त्र डागण्यात आल्यानं मोठा स्फोट झाला. तसंच या घटनेत एका अंगरक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा हल्ला कसा झाला? इस्रायल, त्यांच्या गुप्तचर संस्थांचा यात सहभाग होता का? असे प्रश्न आंतरराष्ट्रीय समुदायाकडून विचारले जात आहेत.

इस्रायलचा सहभाग? : इराण सरकार तसंच इराणी रिव्होल्युशनरी गार्ड (IRG), या हल्ल्याचा तपास करत आहे. त्यांनी या हल्ल्याला इस्रायला जबाबदार धरलं आहे. हमासनंही प्रत्यूत्तर दिलं असून आपल्या राजकीय नेत्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. या हल्ल्यानंतर हमासच्या अल कासम ब्रिगेडनं इस्रायलचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. एका माध्यमातील वृत्तानुसार इस्रायलनं 2000 पर्यंत पॅलेस्टिनव्याप्त प्रदेशात 500 हून अधिक कारवाया केल्या आहेत. यात 1 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायलनं आणखी 1 हजार ऑपरेशन सुरू केले होते. त्यापैकी 168 ऑपरेशन यशस्वी झाले आहेत. इस्रायलनं गाझा पट्टी तसंच विदेशात हमासच्या नेत्यांना ठार मारण्याच्या उद्देशानं आणखी किमान 800 ऑपरेशन सुरू केले आहेत.

मोसाद कशी हत्या घडवून आणते? :

  • टार्गेट : इस्रायली गुप्तचरांकडून टार्गेट ठरवलं जातं. यात मोसाद तसंच इस्रायली गुप्तचर संस्था संघटनात्मकपणे काम करतात. कधीकधी इतर देशात इस्रायलच्या सैन्यदलाद्वारेदेखील ते टार्गेट सेट करतात.

असा करतात प्लॅन तयार : एकदा टार्गेट सेट झालं की, त्यावर ते निर्णय घेतात. टार्गेटची हत्या करायची की नाही? हत्या झाल्यावर त्याचे फायदे काय आहेत? हत्या करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग ठरवला जातो. एकदा मोसादच्या विशेष युनिटनं टार्गेटवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर पुढील कारवाईसाठी फाईल इंटेलिजेंस सर्व्हिसेस कमिटीच्या प्रमुखांकडं जाते. यात इस्रायली गुप्तचर संघटनांचे प्रमुख असतात. त्यांना Vaadan Rashei Ha-Sherutim ( VARASH) या नावानं ओळखलं जातं. VARASH केवळ ऑपरेशनवर चर्चा करून सूचना देतात. मात्र, त्यांना ऑपरेशनला मंजूरी देण्याचा कायदेशीर अधिकार नाहीय. अशा ऑपरेशनला मंजुरी देण्याचा अधिकार फक्त इस्रायलच्या पंतप्रधानांना आहे. इस्रायलचे पंतप्रधान सामान्यत: राजकीय कारणांसाठी असा निर्णय स्वतःहून न घेणं पसंत करतात. अनेकदा पंतप्रधान त्यांच्या निर्णयात एक किंवा दोन इतर मंत्र्यांना सामील करतात. यात अनेकदा संरक्षण मंत्री समाविष्ट असतात. एकदा ऑपरेशनला मंजुरी मिळाल्यावर नियोजन तसंच अंमलबजावणीसाठी फाईल मोसादकडं पाठवली जाते. त्यानंतर मोसाद त्यावर निर्णय घेतं. यासाठी त्यांनी सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो.

सीझेरिया युनिट : सीझेरिया ही मोसादमधील एक गुप्त ऑपरेशनल शाखा आहे. हे युनिट प्रामुख्यानं अरब देश तसंच जगभरात गुप्तहेरांची निवड करते. सीझरिया हे CIA च्या स्पेशल ॲक्टिव्हिटीज सेंटर (SAC) च्या समतुल्य आहे. या युनिटची स्थापना 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला करण्यात आली होती. तिचे संस्थापक एक प्रसिद्ध इस्रायली गुप्तहेर माईक हरारी होते. त्यानंतर हरारीनं सीझेरियाचं सर्वात प्राणघातक युनिट स्थापन केलंय. त्याला हिब्रूमध्ये किडॉन म्हणून ओळखलं जातं. किडॉनचे सदस्यांना बहुतेकदा इस्रायलच्या सैन्यातून घेतलं जातं. सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मोसादनं केवळ पॅलेस्टिनी नेते तसंच कार्यकर्तेच नव्हे, तर सीरियन, लेबनीज, इराणी आणि युरोपियन लोकांनाही लक्ष्य केलंय. सीझेरिया ही माहिती गोळा करण्यासाठी तसंच भविष्यातील लक्ष्यांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्तचर नेटवर्कचा वापर करते.

  • अरब-मोसाद सहकार्य : मोसादचे अनेक अरब गुप्तचर सेवांशी, विशेषत: जॉर्डनस मोरोक्कन गुप्तचर संस्थांशी औपचारिक संबंध आहेत. मोसादनं अनेक अरब आखाती देशासह इजिप्तशी संबंध वाढवले ​​आहेत. मोसादनं जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये ऑपरेशनसाठी विस्तीर्ण प्रादेशिक केंद्र तयार केलंय.

हे वाचलंत का :

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.