हैदराबाद Valentine Week 2024 : प्रेमात पडलेल्या व्यक्तीला सर्व जग गुलाबी दिसतं, असं म्हणतात. प्रेमी युगुलांसाठी फेब्रुवारी महिना वेगळ्या अर्थाने गुलाबी रंग लेऊन आलेला महिना आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. 'लव्ह बर्ड्स' या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. याच महिन्यात 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन्स डे' जगभरात साजरा केला जातो. 'व्हॅलेंटाईन्स डे' लवकरच, 7 फेब्रुवारी (रोज डे) ने सुरू होणार आहे, जो 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन्स डे'नं समाप्त होईल. 'व्हॅलेंटाईन्स डे'ला लोक त्यांच्या जोडीदारांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्यासोबत हँग आउट करण्याची योजना बनवून त्यांना सरप्राईज देतात. हे सर्वांनाच माहित आहे, पण तुम्हाला हे देखील माहित आहे का की 'व्हॅलेंटाईन्स डे' फक्त 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? शेवटी, सेंट व्हॅलेंटाईन कोण होता? 'व्हॅलेंटाईन्स डे'चा इतिहास काय आहे आणि तो साजरा करण्यामागील खरी सुंदर कथा काय आहे ते जाणून घेऊ या.
'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्याची सुरुवात कशी झाली? : 'व्हॅलेंटाईन्स डे' दरवर्षी 14 फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो. ज्याची सुरुवात रोमन राजा क्लॉडियसच्या काळात झाली. असे म्हणतात की त्या काळी रोममध्ये सेंट व्हॅलेंटाइन नावाचा एक धर्मगुरू होता. 'व्हॅलेंटाईन्स डे'ची ही कहाणी त्यांच्या प्रेमाला आणि त्यागाला समर्पित आहे. ज्यांच्या नावाने नंतर 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा केला जाऊ लागला.
'व्हॅलेंटाईन्स डे'चा इतिहास काय आहे? : खरं तर राजा क्लॉडियसचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह पुरुषांच्या शक्तीचा नाश करतात. या विचारामुळे त्यांनी आपल्या राज्यात एक आदेशही काढला की राज्यातील अधिकारी आणि सैनिक लग्न करू शकत नाहीत. पण त्याउलट, सेंट व्हॅलेंटाईन नेहमीच जगात प्रेम वाढवण्याबद्दल बोलत असे. जेव्हा सेंट व्हॅलेंटाईनला राजाचा हा आदेश कळला तेव्हा त्याने विरोध केला. त्यांनी अनेक सैन्य अधिकारी आणि सैनिकांची लग्ने करून दिली. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याने 14 फेब्रुवारी 269 रोजी संत व्हॅलेंटाइनला फाशी दिली. त्याच्या मृत्यूनंतर, लोकांनी त्याच्या बलिदानाचा सन्मान केला आणि त्याच्या स्मरणार्थ 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला.
'व्हॅलेंटाईन डे' पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात रोमन सनापासून झाली. 496 साली जगात प्रथमच 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्यात आला. त्यानंतर, पाचव्या शतकात, रोमच्या पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. या दिवसापासून रोमसह जगभरात दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात 'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला.
हेही वाचा :