ETV Bharat / bharat

सुट्टीच्या दिवशी भरविली शाळा; बस पलटी होऊन सात विद्यार्थ्यांचा मृत्यू - Haryana School Bus Accident - HARYANA SCHOOL BUS ACCIDENT

Haryana School Bus Accident : हरियाणातील महेंद्रगडमध्ये एक भीषण अपघात घडलाय. जीएल पब्लिक स्कुलची बस उलटून 7 मुलांचा मृत्यू झालाय. या अपघातात काही मुलं गंभीर जखमी झाली आहेत.

Haryana School Bus Accident
हरियाणात शाळेच्या बसला भीषण अपघात; सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 12:17 PM IST

Updated : Apr 11, 2024, 2:24 PM IST

महेंद्रगड (हरियाणा) Haryana School Bus Accident : हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात स्कूल बस उलटून 7 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात अनेक शाळकरी मुलं जखमी झाली आहेत. महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना उपविभागातील उन्हानी गावाजवळील वळणावर जीएल पब्लिक स्कुल शाळेची बस पलटी झाल्यानं हा अपघात झालाय.

बसमध्ये होती 35-40 मुलं : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएल पब्लिक स्कूल या खासगी शाळेच्या बसमध्ये सुमारे 35 ते 40 मुलं होती. आज सरकारी सुट्टीच्या दिवशीही शाळा भरवण्यात आल्या होत्या. अपघात झालेल्या ठिकाणी तीव्र वळण असल्यानं चालकाचं बसवरील ताबा सुटला. त्यामुळं बस झाडावर आदळली. त्यामुळे बस पलटी झाली.

सरकारी सुट्टी असूनही शाळा सुरु : या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. बाब म्हणजे आज ईदनिमित्त सरकारी सुट्टी असतानाही शाळा सुरु होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठवण्यात येतंय. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात कशामुळं झाला हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

चालक मद्यधुंद होता : मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बस चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतरच चालक मद्यधुंद होता की नाही, हे सांगता येईल.

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल : या अपघातानंतर हरियाणाचे शिक्षण राज्यमंत्री सीमा त्रिखा यांनी म्हटलंय की, "या अपघातातील दोषींना सोडलं जाणार नाही. 7 घरांमध्ये अंधकार झाला. आहेत. ही अत्यंत दुःखद घटना आहे. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मी माझ्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं आहे. मी स्वतः घटनास्थळी पोहोचत आहे. सरकारी सुट्टीच्या दिवशी शाळा उघडणं कायद्याचे उल्लंघन आहे. शाळा प्रशासनावरही कारवाई केली जाईल. बसचीही तपासणी केली जाईल."

मुलीला पाहण्यासाठी गेलेल्या पालकांचाही अपघात : महेंद्रगडमध्ये स्कूल बसच्या अपघातात अनेक कुटुंबात शोककळा पसरलीय. अपघाताची माहिती मिळताच आई-वडील आपल्या मुलीला पाहण्यासाठी धावले. त्यांचाही वाटेत अपघात झाला. यात मुलीच्या आईचा पाय मोडला आहे. या स्कूल बसच्या अपघातात त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. छत्तीसगडच्या भीषण अपघाताची चौकशी करण्याचे दुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, राष्ट्रपतीसह पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक - durg bus accident
  2. खासगी कंपनीची बस 40 फूट खोल खाणीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू - Durg Bus Accident

Last Updated : Apr 11, 2024, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.