ETV Bharat / bharat

5 हजार रेल्वे गाड्यांची नावे आणि नंबर लक्षात ठेवणारा 'रेल्वे पंडित अक्षद' - AKSHAD PANDIT

समाजात जगत असताना दिव्यांगांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. परंतु दिव्यांग असूनही अक्षद पंडितला ५ हजार गाड्यांची नावे, क्रमांक आणि वेळापत्रक तोंडपाठ आहे.

Akshad Pandit
अक्षद पंडित (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2024, 12:17 PM IST

रतलाम : लहानपणापासूनच दिव्यांग असलेला रतलामचा अक्षद पंडित हा रेल्वेचा विकिपीडिया आहे. गुगल सर्च इंजिनप्रमाणे तुम्ही रेल्वे गाड्यांबाबत प्रश्न विचारल्यास तो तुम्हाला माहिती देण्यास सुरुवात करतो. तेही परिपूर्ण आणि अचूक. अक्षदला जवळपास 5000 गाड्यांची नावे, क्रमांक आणि वेळापत्रक पाठ आहे.

लोक अक्षदला फोन करून माहिती विचारतात : जेव्हा आपल्याला ट्रेननं प्रवास करायचा असतो तेव्हा आपण रेल्वेच्या वेबसाइटला भेट देतो किंवा रेल्वेच्या चौकशी क्रमांकावर फोन करतो. परंतु, मध्य प्रदेशातील रतलाममध्ये अनेक लोक २४ वर्षीय अक्षद पंडितला फोन करून ट्रेनची माहिती घेतात. अक्षदला देशभरातील रेल्वे विभागांमध्ये धावणाऱ्या प्रत्येक रेल्वे मार्गाची आणि प्रवासी गाड्यांची नावे, क्रमांक आणि वेळापत्रक महिती आहे.

प्रतिक्रिया देताना अक्षद पंडित (ETV Bharat Reporter)

अक्षदनं ट्रेनचं वेळापत्रक सांगितलं : ईटीव्ही भारतच्या टीमनं रतलाम रेल्वे स्टेशनवरून गोवा, जयपूर, चेन्नई आणि गुवाहाटीकडं जाणाऱ्या ट्रेनची माहिती अक्षदला विचारली. तेव्हा अक्षदने ट्रेनची नावे आणि नंबरच सांगितले नाहीत तर, ती कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी जाते हे देखील सांगितलं.

ट्रेनच्या माहितीसाठी अक्षदला फोन : रतलामचा रहिवासी असलेला अक्षद लहानपणापासूनच दिव्यांग आहे. परंतु त्याच्या तीक्ष्ण स्मरणशक्तीमुळं त्याला 5000 रेल्वे गाड्यांची नावे, क्रमांक आणि वेळापत्रक तोंडपाठ आहे. अक्षदची आई स्वाती पंडित यांनी सांगितलं, "जेव्हा ओळखीच्या लोकांना रेल्वेचं वेळापत्रक जाणून घ्यायचं असतं तेव्हा ते अक्षदला फोन करतात".

ट्रेनने प्रवास करताना लागला छंद : अक्षदचे वडील भुवनेश पंडित यांनी सांगितलं, "अक्षदला लहानपणापासूनच रेल्वेची आवड होती. कुटुंबासोबत रेल्वेनं भोपाळला जायचं तेव्हा तो प्रवासात झोपायाचा नाही. रेल्वे स्टेशनची माहिती देखील लक्षात ठेवायचा. बसल्या बसल्या ट्रेन्सबद्दल ऐकून हळूहळू त्याला संपूर्ण भारतातील ट्रेन्सची माहिती लक्षात ठेवायची आवड निर्माण झाली".

यूट्यूबची घेतली मदत : अक्षदने ट्रेनमधील आपली आवड पूर्ण करण्यासाठी यूट्यूबची मदत घेतली. यूट्यूबवर ट्रेनच्या माहितीचे व्हिडिओ प्ले करून तो ऑडिओमधूनच ट्रेनचे वेळापत्रक लक्षात ठेवायचा. जवळपास 5000 गाड्यांची नावे, क्रमांक आणि वेळापत्रक लक्षात असल्याचं अक्षद पंडितनं सांगितलं. यूट्यूबवरून माहिती घेतल्यानंतर अक्षदने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. ज्यावर तो देशातील सर्व रेल्वे मार्गावरील ट्रेनची माहिती लोकांसाठी अपलोड करतो. अक्षद पंडितच्या यूट्यूब चॅनलवर सामान्य लोकांना ट्रेनची माहिती मिळते.

अक्षदला रेल्वे इंजिनची देखील माहिती : अक्षदला रेल्वे इतकी आवडते की, त्याला ट्रेनच्या माहितीबरोबरच रेल्वे इंजिनांचीही खूप माहिती आहे. ट्रेनमध्ये इलेक्ट्रिक इंजिन आहे की डिझेल हे तो इंजिनच्या आवाजावरून ओळखतो. तसंच ट्रेनचा आवाज ऐकून ट्रेन नदीच्या पुलावरून किंवा बोगद्यातून जात आहे हे देखील ओळखतो. देशातील अनेक रेल्वे स्थानकांची नावं, सर्व वंदे भारत गाड्या आणि त्यांचे मार्ग त्याला तोंडपाठ आहे. २४ वर्षीय अक्षद पंडितची पहिली पसंती रेल्वे आहे. त्याला दिसत नाही, मात्र त्याला संगीत क्षेत्रात करिअर करायचं आहे. त्यानं संगीतात पोस्ट ग्रॅज्युएशन केलय.

हेही वाचा -

  1. रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कसं करणार ऑनलाईन तिकीट बुक?
  2. कल्याण स्थानकावर लोकलचा डबा रुळावरून घसरला, चाकरमान्यांची तारांबळ
  3. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ; तिकिट दर कमी करण्याचा प्रयत्न करणार, रेल्वे राज्यमंत्र्यांची ग्वाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.