अहमदाबाद Mahadev Betting App : सट्टेबाजीमुळे चर्चेत असलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात गुजरात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. कच्छ पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीचे नेटवर्क चालवणाऱ्या महादेव बेटिंग ॲपच्या आरोपीला अटक केली. कच्छ बॉर्डर रेंजचे आयजी चिराग कोरडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून गुजरातमधील पाटण येथे आलेल्या महादेव ॲप डेव्हलपर भरत चौधरीला कच्छ बॉर्डर रेंज पोलिसांनी अटक केली.
Watch: The Bhuj Cyber Cell team has arrested Bharat Chaudhary, who is associated with the Mahadev Betting App. According to the police, Bharat Chaudhary, a resident of Patan who came to Gujarat from Dubai, is the developer of the Mahadev App pic.twitter.com/AUzcQCW0uz
— IANS (@ians_india) July 28, 2024
गुप्त माहितीच्या आधारे अटक : डीआयजी चिराग कोराडिया यांना गुप्त माहिती मिळाली होती की, भरत मामूजी चौधरी नुकताच दुबईहून त्याच्या मूळ गावी पाटणला आला आहे. जो ऑनलाइन बेटिंग महादेव ॲपचा भागीदार आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक बेटिंग आयडी सक्रिय आहेत. तो पाटण शहरातील यश सोसायटी राहत असून त्याच्या गाडीतून बाहेरगावी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळं सायबर क्राईम स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पथकानं विशेष नजर ठेवून आरोपी भरत चौधरी याला अटक केली.
Ahmedabad: Gujarat Police achieved major success in the Mahadev App betting case by arresting Bharat Chaudhary, who runs a large-scale online cricket betting network. Kutch Police found financial accounts worth Rs 5200 crore during interrogation. Significant revelations are… pic.twitter.com/upSrfeuMqQ
— IANS (@ians_india) July 28, 2024
मोबाईलमध्ये बेटिंगसाठी 23 आयडी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत भरत चौधरीच्या फोनमध्ये बेटिंगसाठी 23 आयडी असल्याचं समोर आलं. तर महादेव ॲपच्या वार्षिक उलाढालीच्या खात्यातून एकूण 5200 कोटी रुपयांची रक्कम उघडकीस आली. एका व्हॉट्सॲप ग्रुपमुळं पोलिसांना ही माहिती मिळाली. सायबर टीम आरोपींची चौकशी करत आहे. तपासादरम्यान अलेक मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
15,30,000 रुपयांचा माल जप्त : अटक आरोपींनी त्याच्यासह अन्य आरोपींची नावेही साथीदार म्हणून उघड केली. सायबर गुन्हे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी पाटण शहरातील बी डिव्हिजन पोलीस ठाण्यात क्रिकेट बेटिंगचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय भुज सायबर सेलने भरत चौधरीकडून 15,30,000 रुपयांचा मालही जप्त केला आहे. आरोपी भरत चौधरीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
साथीदार आरोपींची नावं समोर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरत चौधरीनं आपले साथीदार आरोपींची नावेही सांगितली आहेत. यामध्ये सौरभ चंद्राकर, अतुल अग्रवाल, दिलीप कुमार माधवलाल प्रजापती, रविकुमार सिंह, रोनक कुमार यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी सध्या दुबईला राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महादेव बेटिंग ॲपचं महाराष्ट्र कनेक्शन : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात राज्यात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. याआधी या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आलं होतं. पुण्यातील नारायणगावमधून 70 जणांना अटक करण्यात आली. त्यात एका मोठा व्यापारीचा समावेश होता. त्यानंतर बीड कनेक्शनही समोर आलं होतं. बीडमधून चालवल्या जाणाऱ्या सट्टयावर सायबर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं.
- बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना समन्स : बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना महादेव बेटिंग ॲप प्रकणात चौकशीसाठी ईडीने समन्स बजावल्यानंतर हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं. अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, सनी लियोनी, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह अनेकांच्या नावाचा यामध्ये समावेश होता.
बेटिंग ॲप प्रकरणाची सुरूवात कोणी केली? : छत्तीसगड भिलाई येथील सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी महादेव बेटिंग ॲप सुरू केलं. ते दुबईतून या ॲपचं काम करत होते. महादेव बेटिंग ॲपसाठी भारतासह परदेशात कॉल सेंटर्स उघडली होती. त्या माध्यमातून ते ऑनलाइन सट्टेबाजी करत होते. या ऑनलाईन बेटिंग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं लाँडरिंग केल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं होतं.
हेही वाचा
- आयएएस होण्याच्या स्वप्नावर फिरलं पाणी, स्टडी सेंटरमधील पावसाच्या पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू - RAJENDRA NAGAR WATERLOGGING
- गंभीर जखमी चीनच्या नाविकाला दिलं जीवदान; नौदल जवानांनी जीवाची बाजी लावून रुग्णाला काढलं सुरक्षित बाहेर - Indian Navy Airlifts
- NEET पेपर लीकवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पुन्हा परीक्षा होणार नाही - NEET Paper Leak