नवसारी Gujarat girl death : कोणत्याही गोष्टीवर उत्तर म्हणजे अनेकांना गुगल सर्च वाटते. पण अर्धवट ज्ञान आणि माहितीकरिता संपूर्पणं गुगलवर अवलंबून असल्यानं एका तरुणाची थेट तुरुंगात रवानगी झाली. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये तरुणीचा गुढ परिस्थितीत मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शारीरिक संबंध ठेवताना मुलीला रक्तस्त्राव होत होता. तरीही पीडितेच्या प्रियकरानं तिला रुग्णालयात नेले नाही. त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर जलालपूर पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजण्याच्या सुमारास चिखली येथील एका गावात राहणाऱ्या तरुणानं मैत्रिणीला नवसारी शहरातील हॉटेलमध्ये बोलाविलं. शारीरिक संबंध ठेवताना प्रेयसीचा प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावर काय करावे, हे कळत नसल्यानं तरुण गुगलवर सर्च करत राहिला. तरुणी उपचाराविना 2 तासांहून अधिक वेळ जागेवरच पडून होती. उपचाराअभावी तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांच्या तक्रारीवरून जलालपूर पोलिसांनी तरुणाला अटक केली.
- जिल्हा पोलीस प्रमुख सुशील अग्रवाल यांनी सांगितले," भार्गव नरेंद्रभाई पटेल या २६ वर्षीय मुलाचे सोशल मीडियावरील ओळखीतून चिखली तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीवर प्रेम जुळले. 2 वर्षांच्या प्रेमसंबंधात 23 सप्टेंबर रोजी आरोपीनं लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशानं तरुणीला रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलच्या खोलीत आणले.
गुगलवर सर्च करत राहिला-जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले की, "तरुणानं मुलीसोबत शारीरिक संबंध केल्यानंतर तिच्या त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र, रक्तस्त्राव कसा थांबवायचा याची माहिती त्यानं गुगलवरून मिळवण्याचा प्रयत्न केला. मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जलालपूर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे."
अतिरक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू- शारीरिक संबंध ठेवताना तरुणीला नैसर्गिकपणे रक्तस्त्राव झाल्याची माहिती वसारी जिल्हा पोलिसांना तपासादरम्यान डॉक्टरांकडून मिळाली. परंतु अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधण्याची आवश्यकता होती. मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तरुणानं तात्काळ 108 ला फोन केला असता तर पीडितेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळू शकले असते. कदाचित तिचा जीव वाचला असता, असे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपीला आज BNS 105,238 अन्वये न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.