ETV Bharat / bharat

हरवलेले-चोरी गेलेले मोबाईल फोन सापडतात, रेल्वे पोलिसांनी चोरीचे 150 मोबाईल केले जप्त - चोरी गेलेले मोबाईल फोन सापडतात

recovered 150 stolen mobile रेल्वे पोलिस तेलंगणा विशेष पथकांन C.E.I.R वापरून 150 चोरीचे तसंच हरवलेले 10 लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरट्यांकडून परत मिळवले आहेत. DOT पोर्टलच्या माध्यमातून केवळ 1 महिन्यात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले फोन त्यांच्या मालकांच्या स्वाधीनही करण्यात आल्याची माहिती एडीजीपी महेश भागवत यांनी दिली.

मोबाईल फोन सापडतात
मोबाईल फोन सापडतात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 7:57 PM IST

Updated : Feb 17, 2024, 3:40 PM IST

हैदराबाद Recovered 150 stolen mobile - फोन हरवला किंवा चोरीला गेला की तो परत मिळेल याची शाश्वती मालकाला जवळ-जवळ नसतेच. मात्र अलिकडच्या काळात फोन चोरीला गेला असला तरी तो पुन्हा मिळवता येतो याची खात्री पटू लागली आहे. नवीन तंत्रज्ञनामुळं हे शक्य झालं आहे. तेलंगणा रेल्वे पोलिसांनी ही खात्री त्यांच्या कामगिरीतून पटवून दिली आहे. नुकतेच १५० फोन तेलंगणा रेल्वे पोलिसांनी जप्त करुन त्यांच्या मालकांना दिल्याची माहिती तेलंगणा रेल्वेचे ADGP महेश भागवत यांनी दिली.

CEIR पोर्टलचा वापर करणे गरजेचे - खरं तर 19 एप्रिल 2023 रोजी तेलंगणा राज्यात सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिफाई रजिस्टर पोर्टल सुरू झालं. त्यावेळेपासून रेल्वे पोलीस तेलंगणाने आजपर्यंत एकूण 435 चोरीला गेलेले-हरवलेले मोबाईल परत मिळवले आहेत. ADG रेल्वे महेश भागवत यांनी यापूर्वी CEIR पोर्टलचे तलंगणा राज्य नोडल अधिकारी म्हणून काम केलं आहे. त्यांच्या सूचनांनुसार संपूर्ण रेल्वे पोलीस जिल्ह्यात DSRP ग्रामीण श्री.वाय.नरसिम्हा रेड्डी आणि DSRP काझीपेट यांच्या देखरेखीखाली विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. श्रीनिवास राव यानी तयार केलेल्या पथकांनी एका महिन्यात १० लाख रुपये किमतीचे 150 मोबाईल जप्त केले. यामध्ये बहुतांश CEIR पोर्टलद्वारे नोंदवलेली प्रकरणं आणि मी-सेवा अर्जांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील १३ फोन जप्त - तेलंगणा राज्यासोबतच विशेष पथकांनी इतर राज्यांतूनही मोबाईल जप्त केले आहेत. त्यात केरळ-5, उत्तर प्रदेश-4, महाराष्ट्र-13, कर्नाटक-11, मध्य प्रदेश-8, बिहार-6, तामिळनाडू-7, आंध्र प्रदेश-38 आणि उर्वरित तेलंगणा-58 यांचा समावेश आहे. हे मोबाईल फोन प्रवासादरम्यान एकतर चोरीला गेलेले आहेत, जे पॅसेंजर किंवा खिडकीच्या बाजूला बसलेले होते जेथे त्यांचे फोन काही अज्ञात गुन्हेगारांनी हिसकावले किंवा चोरले गेले. यानिमित्तानं महेश भागवत यांनी सांगितलं की, पोलीस रेल्वे प्रवाशांना विनंती करतात की त्यांनी त्यांच्या सामानाची काळजी घ्यावी आणि रेल्वे स्थानकांवर मोबाइल फोन चोरीला गेल्यास, www.ceir.gov.in वर लॉग इन करून सीईआयआर पोर्टलवर आयएमईआय क्रमांक असलेले तुमचे मोबाइल फोन त्वरित ब्लॉक करावे.

विशेष तपास पथकाचे कौतुक - मोबाईल हरवलेल्या प्रवाशांनी CEIR पोर्टलचा वापर करून IMEI ब्लॉक करण्यासाठी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यानंतरफोन ट्रॅक करुन ते अनब्लॉक करुन मालकांच्या स्वाधीन करण्यात येतात. या कामगिरीचे रेल्वे पोलीस तेलंगणाचे प्रमुख ADGP महेश भागवत SP SRP सिकंदराबाद शेख सलीमा यांनी केवळ 1 महिन्यात 150 फोन रिकव्हर केल्याबद्दल विशेष पथकांचं कौतुक केलं आहे. या सगळ्यांना योग्य ते पुरस्कार दिले जातील असंही भागवत यांनी स्पष्ट केलं.

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश - या कारवाईनंतर सिकंदराबाद रेल्वे स्टेशन GRP कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 67 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप आणि रोख रु. 10,000 असा एकूण ६ आरोपींच्याकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतर गुन्हेगारांच्यासह एरंडोलचा गणेश पाटील या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

हे वाचलंत का...

इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेची झाडाझडती, छत्रपती संभाजीनगरातून ग्राफिक डिझायनरला अटक

सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्स असंवैधानिक का ठरवले? जाणून घ्या या 7 महत्वाची कारणं, १३ मार्चला व्यवहारांची माहिती मिळणार

Last Updated : Feb 17, 2024, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.