नवी दिल्ली : एका नेत्याच्या कथित हत्या प्रकरणावरुन कॅनडानं भारतावर गंभीर आरोप केले होते. हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत भारतानं कॅनडाला सडेतोड उत्तर दिलं होतं. तरीही कॅनडा वारंवार भारताविरोधात आग ओकत आहे. याला जशासतसे उत्तर भारतानं वेळोवेळी दिले आहे. आता एक मोठा निर्णय भारतानं घेतलाय.
कॅनडावर विश्वास नाही : भारत सरकारनं कॅनडातील उच्चायुक्त आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. "अंतरवाद आणि हिंसाचाराच्या वातावरणात कॅनडातील ट्रुडो सरकारच्या कृतींमुळं आमच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली हे अधोरेखित झालं. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सध्याच्या कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेवर आमचा विश्वास नाही. त्यामुळं कॅनडातील उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे," अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली.
It was underlined that in an atmosphere of extremism and violence, the Trudeau Government's actions endangered their safety. We have no faith in the current Canadian Government's commitment to ensure their security. Therefore, the Government of India has decided to withdraw the… pic.twitter.com/WUOQAV4SIc
— ANI (@ANI) October 14, 2024
भारताचा मोठा निर्णय : भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलेला खलिस्तानवादी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सोमवारी भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. या बैठकीनंतर भारतानं कॅनडातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला.
हत्या प्रकरणात जोडलं : ट्रूडो सरकारनं आपल्या नुकत्याच केलेल्या तपासात कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांचं नाव हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात जोडलं होतं. त्यानंतर भारतानं कडक शब्दात कॅनडा सरकारला सुनावलं होतं. त्यानंतर वेगानं घडामोडी घडल्या व भारत सरकारनं आपल्या अधिकाऱयांना परत बोलावलं आहे.
#WATCH | Delhi: Canadian Chargé d'Affaires Stewart Wheeler leaves from the MEA.
— ANI (@ANI) October 14, 2024
He says, " ...canada has provided credible, irrefutable evidence of ties between agents of the government of india and the murder of a canadian citizen on canadian soil. now, it is time for india to… pic.twitter.com/RdOXRpoTg6
चौकशी करावी - कॅनडा : परराष्ट्र मंत्रालयातून बाहेर पडताना, कॅनडाच्या मिशनचे प्रभारी स्टीवर्ट व्हीलर म्हणाले की, "कॅनडातील भारत सरकारचे अधिकारी आणि कॅनडाच्या नागरिकाची हत्या यांच्यातील संबंधांचे विश्वसनीय पुरावे दिले आहेत. आता भारतानं आपल्या वचनाचं पालन करण्याची आणि त्या सर्व आरोपांची चौकशी करण्याची वेळ आली आहे."
हेही वाचा