ETV Bharat / bharat

Global recycling day 2024 : कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर पर्यावरण येईल धोक्यात - Global recycling day 2024

Global recycling day 2024 : ग्लोबल रीसाइक्लिंग दिवस आज 18 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्व आहे. या दिवशी रीसाइक्लिंगविषयी जनजागृती केली जाते.

Global recycling day 2024
ग्लोबल रीसाइक्लिंग दिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 12:05 PM IST

मुंबई - Global recycling day 2024 : ग्लोबल रीसाइक्लिंग दिवस हा वार्षिक कार्यक्रम आहे ,ज्याचा उद्देश पुनर्वापराच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे, कचरा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा आहे. पुनर्वापराचे फायदे हायलाइट करण्यासाठी हा दिवस जगभरातील व्यक्ती, संस्था आणि सरकारांना एकत्र आणतो. 2018 मध्ये ग्लोबल रिसायकलिंग फाउंडेशननं लॉन्च केलेला हा वार्षिक कार्यक्रम रीसाइक्लिंगचे महत्त्व सांगतो. आपल्या पृथ्वीवरचे भविष्य आणि आपल्या मूलभूत संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. या दिवशी प्रत्येक शहरामध्ये अनेक मोहिम राबवल्या जातात.

ग्लोबल रीसाइक्लिंग दिवस : पुनर्वापरामुळे कचरा कमी करण्यात आणि संसाधनांचे संरक्षण करण्यात मदत होते. रिसायकलिंगबद्दल माहिती शेअर करण्यासाठी अनेकजण आता सोशल मीडियाचा वापर करू शकतात. लोकांना जागृत करण्यासाठी हा एक योग्य मार्ग आहे. दरम्यान तुम्ही पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या वापरणे, अन्नाचा अपव्यय कमी करणे आणि घातक पदार्थांची योग्य विल्हेवाट लावणे यासारखे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत छोटे बदल करून सुरुवात करू शकता. याशिवाय आजच्या दिवशी तुम्ही रीसायकलिंग कार्यक्रमांमध्येही सहभागी आणि सामुदायिक क्लीनअपमध्ये स्वयंसेवक होऊ शकता.

पुनर्वापर म्हणजे काय: पुनर्वापर म्हणजे वापरलेल्या वस्तूंना पुन्हा वापरता येण्याजोगी बनवण्याची किंवा पर्यावरणपूरक घटकांमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे. पुनर्वापराचे तीन मुख्य टप्पे आहेत. टाकाऊ वस्तू गोळा करणे. त्यांना नवीन उत्पादनांमध्ये रूपांतरित करणे आणि ती उत्पादने खरेदी करणे जेणेकरुन ते नंतर पुनर्वापर करता येतील.

जर्मनीचा रिसायकलिंग दर अव्वल : ग्लोबल रीसायकलिंग जगभरात साजरा केला जातो. पहिला जागतिक पुनर्वापर दिन 18 मार्च 2018 रोजी साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा वार्षिक कार्यक्रम साजरा केला जातो. जर्मनीमध्ये जगातील सर्वात जास्त रिसायकलिंग दर आहे. भारतात 66.1 टक्के कचऱ्याचा प्रभावी पुनर्वापर करतात. गेल्या काही दशकांमध्ये, जगभरात पुनर्वापराचे दर वाढविण्यावर प्रचंड भर दिला जात आहे आणि युरोप पुनर्वापराच्या संदर्भात जगातील इतर देशांपेक्षा चांगले काम करत आहे. 'गोल्ड रिफायनिंग अँड रीसायकलिंग' नावाच्या डब्लूजीसी (WGC) अभ्यासानुसार, 2021 मध्ये 75 टन कचरा रीसाइक्लिंग करून भारत जगातील चौथा सर्वात मोठा पुनर्वापर करणारा देश बनला आहे. त्यामुळे आपल्या सवयीमध्ये आपण थोडा बदल आणायला पाहिजे.

हेही वाचा :

  1. word consumer day : 2024 च्या ग्राहक हक्क दिनाची थीम 'ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार एआय'
  2. World Kidney Day: जागतिक मूत्रपिंड दिन आज होतोय साजरा, जाणून घ्या कसं राहायचं निरोगी
  3. किशोर मानसिक आरोग्य दिन : किशोरावस्थेतील मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करणे महत्वाचे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.