कलबुर्गी (कर्नाटक) Prajwal Revanna Lookout Notice : कर्नाटकातील JDSचे लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं (SIT) गुरुवारी त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केलंय. जगभरातील सर्व इमिग्रेशन पॉईंटवर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी प्रज्वल रेवन्नासह त्यांचे वडील एचडी रेवन्ना यांच्या अटकेचेही यावेळी संकेत दिले आहेत. गुलबर्गा येथे चैकशीसाठी रेवन्ना उपस्थित न झाल्यास त्यांना अटक केली जाईल, असे संकेत मिळत आहे. 26 एप्रिल रोजी प्रज्वल रेवन्ना जर्मनीतील फ्रँकफर्टला पळून गेल्यानंतर त्यांच्याविरुद्ध राज्य सरकारनं कडक पावलं उचलली आहेत.
लुकआउट नोटीस जारी : 'प्रज्वल रेवन्ना परदेशात गेल्याची माहिती मिळताच लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. आम्ही सर्व बंदरे, विमानतळांना लुकआउट नोटीसची माहिती दिली आहे,' असं गृहमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं. प्रज्वल हा माजी पंतप्रधान तथा JD(S) प्रमुख एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. तसंच माजी मंत्री एचडी रेवन्ना यांचा मुलगा आहे. 26 एप्रिलनंतर कर्नाटकातील हसनमध्ये मतदान संपल्यानंतर तो जर्मनीला पळून गेल्याची माहिती आहे. प्रज्वल रेवन्ना (33 वर्ष) खासदाराच्या व्हिडिओ क्लिप काही दिवसांपासून हसनमध्ये फिरू लागल्या होत्या. रेवन्ना हसन लोकसभा मतदारसंघातील NDA उमेदवार आहेत. या जागेवर 26 एप्रिल रोजी मतदान झालंय. SITचे चैकशी पथक आरोपींना वेळ द्यायचा की, नाही याबाबत कायदेशीर बाबी पडताळून पहाताय. 24 तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नसल्यामुळं एसआयटी त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.
प्रज्वलविरोधात तक्रार दाखल : एका महिलेनं प्रज्वलसह त्यांच्या वडिलांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पीडितेनं प्रज्वलविरोधात तक्रार दाखल केली असून पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे, मात्र याचा तपशील मी सांगू शकत नाही, असं गृहमंत्री म्हणाले. बुधवारी, रेवन्ना यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये तपास पथकासमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. "मी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी बंगळुरूमध्ये नसल्यामुळं, मी माझ्या वकिलामार्फत कळवलं आहे. लवकरच सत्य समोर येईल," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. रेवन्ना यांच्यावर आयपीसीच्या कलम 354A, 354D, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसआयटी नोंदवणार जबाब : या प्रकरणातील पीडितसह त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यासाठी एसआयटी त्यांना सुरक्षा पुरवेल. एसआयटी कोणत्याही पीडितेवर दबाव आणणार नाही, त्यांनी स्वत:हून पुढं आल्यास जबाब नोंदवला जाईल. प्रज्वल यांच्याविरोधात दोन महिलांनी तक्रार दाखल केल्याचं गृहमंत्री परमेश्वर यांनी सांगितलं.
कथित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल : प्रज्वल रेवन्ना यांच्यावर शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित कथित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रज्वलनं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर हजर राहण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितली आहे. प्रज्वलनं तपास पथकाला सांगितलं की, तो बेंगळुरूच्या बाहेर आहे. प्रज्वलसह त्याच्या वडिलांना चौकशीसाठी एसआयटीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रज्वल रेवन्नाची लाज वाटते : प्रज्वल रेवन्ना यांच्या 'अश्लील व्हिडिओ' प्रकरणावर माजी केंद्रीय मंत्री डॉ. वीरप्पा मोईली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रज्वल रेवन्ना घोटाळा करणारा माणूस आहे. एक राजकारणी म्हणून आम्हाला प्रज्वल रेवन्ना यांची लाज वाटते. त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पोहिजे.'बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी लाजेनं आपली मान खाली घातली पाहिजे.'
हे वाचलंत का :