ETV Bharat / bharat

Gujarat University : गुजरात विद्यापीठात नमाज पठणावरुन वाद; चार परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला - Foreign Students Attacked Gujarat

Foreign Students Attacked Gujarat University : गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची घटना शनिवारी (16 मार्च) रात्री उशीरा घडलीय. यात चार परदेशी विद्यार्थी जखमी झाले आहेत. वाचा काय आहे नेमकं प्रकरण...

Gujarat University hostel
Gujarat University hostel
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 3:45 PM IST

Updated : Mar 17, 2024, 4:12 PM IST

गांधीनगर Foreign Students Attacked Gujarat University : गुजरात विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. वसतिगृह परिसरात रमजान दरम्यान नमाज पठणावरुन वाद झाला. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसंच वसतिगृहाच्या खोल्यांमध्येही घुसून तोडफोड करण्यात आलीय. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण आहे.

नमाज पठणावरुन वाद : अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, सीरिया, आफ्रिक आदी देशांतील विद्यार्थी गुजरात विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उझबेकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका येथील चार विद्यार्थी त्यांच्या खोलीत नमाज पठण करत होते. त्याचवेळी एका गटानं निषेध करत धार्मिक घोषणा दिल्या. यावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली.

परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला : गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या ए ब्लॉकमध्ये एका गटानं परदेशी विद्यार्थ्यांवर दगडफेक केली. तसंच जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी वाहनाचंही नुकसान करण्यात आलं. यात चार जण जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. रात्री उशीरा ही घटना घडल्याचं पीआय एसआर बावा यांनी सांगितलं. या घटनेचा तपास चालू असल्याचं देखील ते म्हणाले.

ओवैसींकडून घटनेचा निषेध : याप्रकरणी खासदार ओवैसी यांनी ट्विट करून घटनेचा निषेध केलाय. घटनेची माहिती मिळताच जमालपूरचे आमदार इम्रान खेडवाला तसंच माजी आमदार घियासुद्दीन शेख घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी पोलीस आयुक्तांना सखोल तपास करण्याची विनंती करत धार्मिक असहिष्णुतेच्या अशा घटना खपवून घेतल्या जाणार नसल्याचं सांगितलं.

परदेशी विद्यार्थ्यांचा आरोप : गुजरात विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, "नमाजाच्या वेळी मुलांचा एक गट वसतिगृहात घुसला. तसंच त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला केला व खोलीतील सामानांची तोडफोड केली.

हे वाचलंत का :

  1. Amsha Padvi : ठाकरेंना मोठा धक्का, आमश्या पाडवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश
  2. काँग्रेस नसती तर तुमचं काय झालं असतं? चर्चा करायला कधीही तयार... सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला
  3. Bharat Jodo Nyay Yatra: 90 टक्के लोकसंख्या अन्यायामुळे त्रस्त-राहुल गांधी

Last Updated : Mar 17, 2024, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.