जम्मू-काश्मीर : राजौरी जिल्ह्यातील कांडी भागात रविवारी अन्नातून झालेल्या विषबाधामुळं एकाच कुटुंबातील चौघांचा मुत्यू झाला. तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. अजील हुसैन यांचा राजौरी येथे मृत्यू झाला, तर राबिया कौसर, हरमाना कौसर आणि रफ्तार अहमद यांचा जम्मूतील श्री महाराजा गुलाब सिंग (एसएमजीएस) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच इतर दोघांवर एसएमजीएस रुग्णालात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
अन्नातून झाली विषबाधा : रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "कुटुंबातील सर्व सहा सदस्यांनी एकत्र जेवण केलं होतं, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, जिथे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक वैद्यकीय मदत दिली. परंतु रूग्णांची जास्त प्रकृती बिघडली, ज्यामुळं त्यांना विशेष काळजी घेण्यासाठी SMGS रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं."
अन्नाचे नमुने तपासणीसाठी दिले : पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मात्र, या दुःखद घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे. इतर दोघांना बरे होण्यासाठी स्थानिक नागरिक प्रार्थना करत आहेत. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षेच्या महत्त्वावर भर दिला असल्याचं सांगितलं.
हेही वाचा -