ETV Bharat / bharat

देवघरवरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; कारच्या भीषण अपघातात 5 कावडधाऱ्यांचा मृत्यू - Latehar Road Accident

Latehar Road Accident : देवघरवरुन परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातानंतर ही कार विजेच्या खांबाला धडकल्यानं भाविकांना जोरदार विजेचा धक्का बसला. या अपघातात तब्बल 5 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत.

Latehar Road Accident
जखमींची विचारपूस करताना वरिष्ठ पोलीस अधिकारी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 7:41 AM IST

रांची Latehar Road Accident : देवघरवरुन परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातल्यानं मोठी खळबळ उडाली. भाविकांची कार अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना बाळुमठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टमटम टोलाजवळ गुरुवारी पहाटे घडली. या घटनेत आणखीही भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना बाळुमठ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भीषण कार अपघातात 5 भाविकांचा मृत्यू : देवघरमध्ये पूजा करुन हे भाविक कारनं बाळुमठ इथल्या मकियातंड गावात आपल्या घरी परत येत होते. यावेळी टमटम टोलाजवळील वळणावर कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन विजेच्या खांबाला धडकली. या भीषण धडकेनं खांब पडला त्यामुळे अनेक भाविकांचा विद्युत तारेला स्पर्श झाला. या अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. बाळुमठचे पोलीस अधीक्षक आशुतोष सत्यम यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकानं तातडीनं मदतकार्य सुरू केलं आहे. जखमी भाविकांना बाळुमठच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. हावडा सीएसएमटी एक्सप्रेस अपघातग्रस्तांना 50 हजारांची मदत, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल - Howrah Mumbai Train Accident
  2. पत्रकार हर्षल भदाणे यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू, चालकाला अटक - Journalist Harshal Bhadane
  3. उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; महाराष्ट्रातील दोघांसह 3 यात्रेकरुंचा मृत्यू, 5 जखमी - Kedarnath land slide incident
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.