ETV Bharat / bharat

लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली शपथ, विरोधकांचे टोचले कान - First Session Of 18th Lok Sabha - FIRST SESSION OF 18TH LOK SABHA

First Session Of 18th Lok Sabha : लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. तिसऱ्या टर्ममध्ये तीनपट जास्त काम करू, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर विरोधकांवरही त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला.

First Session Of 18th Lok Sabha
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 11:09 AM IST

Updated : Jun 24, 2024, 11:47 AM IST

नवी दिल्ली First Session Of 18th Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएननं केंद्रात सरकार स्थापन केलं आहे. आजपासून लोकसभा अधिवेशन 2024 ला सुरुवात झाली आहे. आज सकाळी लोकसभेचे तालिका सभापती म्हणून भर्तृहरी महताब यांची निवड करण्यात आली. तालिका सभापती भर्तृहरी महताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे चांगलेच कान टोचले. "नागरिकांना विरोधकांचा ड्रामा नाही, तर चांगल्या कामाची अपेक्षा आहे," असा हल्लाबोलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली शपथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू झालेल्या 18 व्या लोकसभा अधिवेशनात खासदारकीची शपथ घेतली. "मी नरेंद्र दामोददास मोदी, ईश्वराची शपथ घेतो. विधीद्वारा स्थापित भारताचं संविधानाच्या प्रति खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवेल. मी भारताची प्रभुता आणि अखंडता कायम ठेवेल. माझ्या कर्तव्याचं श्रद्धापूर्वक निर्वहन करेल" अशी शपथ त्यांनी यावेळी घेतली. यावेळी सभागृह फक्त मोदी मोदी मोदी अशा गगणचुंबी घोषणांनी दणाणून गेलं.

विरोधक ड्रामा न करता, चांगलं काम करतील : "देशाच्या जनतेनं आम्हाला तिसऱ्या वेळी सत्ता दिली आहे. हा खूप मोठा विजय आहे. जनतेनं आम्हाला दिलेली तिसऱ्या वेळच्या संधीबद्दल देशातील नागरिकांचे आभार, आम्ही पहिल्यापेक्षा तीन पटीनं अधिक काम करू. देशातील नागरिक विरोधकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतात. मात्र 18 लोकसभेत देशातील नागरिक विरोधकांकडून चांगली अपेक्षा करतात, त्यांच्यानुसार कार्य करतील. नागरिकांना ड्रामा, नाटकं होत राहतील, अशी अपेक्षा करत नाहीत. नागरिकांना चांगल्या जबाबदार विरोधकांची गरज आहे. विरोधक चांगलं काम करुन नागरिकांच्या इच्छा पूर्ण करतील," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

18 वी लोकसभा संकल्पानं भरलेली असेल : "स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा भारतानं बांधलेल्या सदनात शपथग्रहण सोहळा होत आहे. नवीन सदनात उपस्थित असलेल्या सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी, विकसित भारत करण्याचा संकल्प घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आपण 18 व्या लोकसभेचा कार्यकाळ अनुभवत आहोत. भारताच्या सांस्कृतिक परंपरेत 18 अंकाला खूप महत्व आहे. आपल्याकडं 18 पुराण आहेत. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. त्यासह ही 18 वी लोकसभा आहे. या लोकसभेत युवा खासदारांची संख्या मोठी आहे."

विरोधकांनी संविधानाची प्रत घेऊन केली घोषणाबाजी : आजपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे. मात्र लोकसभेच्या अधिवेशनात 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी संविधानाची प्रत घेऊन मोठी घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांनी घोषणाबाजी केली.

हेही वाचा :

  1. संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; आता 'यांच्याकडे' संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी
  2. संसद घुसखोरीचा मुख्य आरोपी ललित झाचं वर्णन 'क्रांतिकारी योद्धा', घराबाहेर लागले पोस्टर
  3. "हे बेरोजगारी अन् महागाईमुळे झालं", संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून राहुल गांधींची टीका

Last Updated : Jun 24, 2024, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.