देहराडून Uttarakhand Helicopter Crash : अपघातग्रस्त हेलिकॉप्टरला मीग विमानाद्वारे नेत असताना ते निसटून खाली नदीत कोसळलं. ही धक्कादायक घटना केदारनाथ इथल्या केदारधाम डोंगरावर घडली. हेलिकॉप्टर मंदाकिनी नदीत कोसळताना पाहून नागरिकांनी मोठा आरडाओरडा केला. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे या खराब झालेल्या क्रिस्टल हेलिकॉप्टरचे महत्वाचे भाग अगोदरचं काढून टाकण्यात आले होते.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर नेताना कोसळलं : केदारनाथ इथल्या डोंगरावरुन अपघातग्रस्त हेलिकॉप्टर मीग 17 या विमानानं वाहून नेण्यात येत होतं. यावेळी क्रिस्टल हेलिकॉप्टर कोसळून मोठा अपघात झाला. क्रिस्टल हेलिकॉप्टर वरुन मंदाकिनी नदीत कोसळलं. त्यामुळे हा अपघात पाहणाऱ्या नागरिकांनी मोठा आरडाओरडा केला. आज सकाळी हा अपघात झाल्यानंतर नागरिकांना मोठा हादरा बसला.
केदारनाथ धाम इथं लँडींग करताना झाला होता अपघात : भारतीय सैन्य दलाच्या MI17 या विमानानं क्रिस्टल हेलिकॉप्टर आज सकाळी वाहून नेण्यात येत होतं. मात्र यावेळी तांत्रिक कारणामुळे ते खाली कोसळून मोठा अपघात झाला. वाहून नेण्यात येणारं क्रिस्टल हेलिकॉप्टर हे या वर्षी 24 मे रोजी केदारनाथ धाम इथं तांत्रिक बिघाड झाल्यानं हेलिपॅडवर पोहोचण्याअगोदरचं तांत्रिक बिघाड झाल्यानं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रवासी होते. मात्र, या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
हेलिकॉप्टरचे काढले अगोदरचं महत्वाचे भाग : अपघातग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे महत्वाचे भाग अगोदरचं काढण्यात आले होते. त्यामुळे हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर भारतीय सैन्य दलाच्या MI17 ने सुरक्षीत स्थळावर नेण्यात येत होतं. मात्र हेलिकॉप्टर घटनास्थळावरुन नेताना तांत्रिक कारणानं ते वरुन खाली कोसळलं. डोंगरावरुन ते थेट मंदाकिनी नदीत कोसळल्यानं नागरिकांनी मोठा आरडाओरड केली.
हेही वाचा :
- मुंबईहून हैदराबादकडे जाणारं हेलिकॉप्टर पुण्याजवळ कोसळलं, थरार प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांच्या फोनमध्ये कैद - helicopter crashes in Pune
- देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं : अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Devendra Fadnavis
- सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर झालं क्रॅश; थरार कॅमेऱ्यात कैद - Helicopter Crash In Mahad