ETV Bharat / bharat

फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन; नेटकरी चिंतेत - मेटा सर्व्हर डाऊन

Facebook Instagram Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालंय. या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. त्याचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिसून आलाय.

Facebook Instagram Down
फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 10:00 PM IST

Updated : Mar 5, 2024, 10:38 PM IST

नवी दिल्ली Facebook Instagram Down : मंगळवारी रात्री 9 वाजल्यापासून फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) पूर्णपणे डाऊन झालंय. नेटकऱ्यांचे फेसबुक (Facebook) लॉग आऊट झालं असून लॉग इन करताना अडचणी येत आहेत. नेटकऱ्यांनी मंगळवारी (दि.5) रात्री 9 वाजल्यापासून या अडचणांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीही अनेकदा अशा समस्यांना नेटकऱ्यांना सामोरे जावं लागलं होतं.

नेटकरी संभ्रमात : जगभरात फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालंय. पाच मार्चच्या रात्रीपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्णपणे डाऊन झालं आहे. फेसबुक लॉग आऊट झालं असून पुन्हा लॉग इन करताना अडचणी येत आहेत. मात्र, व्हॉट्सॲपवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. या समस्येमुळं नेटकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय.

कशामुळं झालंय फेसबुक डाऊन? : फेसबुक किंवा इन्स्टाग्रामकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही. दरम्यान, सातत्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय राहणाऱ्या लोकांची चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. फेसबुक वापरता येत नसल्यामुळं लोक अस्वस्थ झाले आहेत. हा सायबर हल्लाही असू शकतो, असं मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. शावेळी अनेक लोक एकाच वेळी सर्व्हरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करतायेत. यामध्ये अनेक फेक अकाऊंटचा समावेश असू शकतो.

करोडो युजर्स : फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे प्रचंड लोकप्रिय आहेत. दररोज करोडो युजर्स हे दोन्ही प्लॅटफॉर्म वापरतात. वेगवेगळी पोस्ट शेयर करत असतात. या प्लॅटफॉर्मवर कुणी आपली कला सादर करत असतं, कुणी आपल्या भावनांना वाट करुन देत असतं, अर्थात या प्लॅटफॉ्र्चा वेगवेगळ्या कामांसाठी वापर केला जातो. प्रत्येकासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे महत्त्वपूर्ण आहे. या दोन्ही अ‍ॅपशिवाय युजर्सचा वेळ जाणं कठीण आहे.

हेही वाचा -

  1. Facebook Instagram verified account : ट्विटरनंतर फेसबुकसह इन्स्टाग्रामवरदेखील वापरकर्त्यांना मोजावे लागणार पैसे
  2. Meta Acts On Facebook Insta : मेटाकडून फेसबूक, इंस्टाग्रामवरील 2.29 कोटींहून अधिक पोस्ट डिलीट
  3. Facebook-Instagram Content : फेसबुक-इंस्टाग्राम 'या' लोकांच्या दाखवणार अधिक पोस्ट सामग्री

Last Updated : Mar 5, 2024, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.