ETV Bharat / bharat

New EC Appointed : ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड, पंतप्रधानांच्या समितीनं केली निवड - New EC Appointed

New EC Appointed : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज (14 मार्च) निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळचे ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) आणि पंजाबचे सुखबीर सिंह संधू (SS Sandhu) यांची नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Ex Bureaucrats SS Sandhu and Gyanesh Kumar appointed as Election Commissioners on March 14
ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 3:58 PM IST

Updated : Mar 14, 2024, 4:42 PM IST

नवी दिल्ली New EC Appointed : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आज (14 मार्च) दोन माजी सनदी अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यानुसार ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे आता निवडणूक आयुक्त असतील. माजी आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयुक्तपद रिकामं होतं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांनीच राजीनामा दिल्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या समितीनं दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची आयुक्तपदी निवड केली आहे.

काँग्रेसच्या खासदारांनी दिली माहिती : आज पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा देखील समावेश होता. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रंजन चौधरी यांनी, केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे सुखबीर संधू यांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी शोध समितीनं काही नावं निवड समितीकडं पाठवली होती. यामध्ये उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदेवर पांडे, सुधीर कुमार, गंगाधर रहाटे यांचा समावेश होता. मात्र, अखेर सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं चौधरींनी सांगितलं.

कोण आहेत ज्ञानेश कुमार? : ज्ञानेश कुमार हे मुळ केरळचे रहिवासी आहेत. ते केरळ केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी असून केंद्रीय गृहमंत्रालयात ज्ञानेश कुमार हे काश्मीर विभागाचे प्रभारी होते. 1988 बॅचचे IAS ज्ञानेश कुमार यांना मे 2022 मध्ये सहकार मंत्रालयाचे सचिव बनवण्यात आले. त्यांची सचिव पदावरून बदली झाली. देवेंद्र कुमार सिंह यांच्या जागी ज्ञानेश कुमार यांची सहकार मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली होती. ज्ञानेश कुमार 31 जानेवारी 2024 रोजी निवृत्त झाले.

कोण आहेत सुखबीर सिंह संधू : सुखबीर सिंह संधू हे 1998 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. 2021 मध्ये जेव्हा पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवण्यात आलं, तेव्हा सुखबीर संधू राज्याच्या मुख्य सचिव पदावर होते. त्यापूर्वी संधू यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अध्यक्ष आणि मानव संसाधन मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागात अतिरिक्त सचिव म्हणूनही काम केलंय. सुखबीर यांनी अमृतसरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलं असून त्याच्याकडं कायद्याची पदवीही आहे. तसंच त्यांनी 'अर्बन रिफॉर्म्स' आणि 'म्युनिसिपल मॅनेजमेंट अँड कॅपॅसिटी बिल्डिंग' या विषयांवर शोधनिबंधही लिहिले आहेत. लुधियाना महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून केलेल्या सेवेबद्दल संधू यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आलं होतं.

हेही वाचा -

  1. Lok Sabha Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार एकाच वेळी ?; निवडणूक आयुक्तांनी दिली 'ही' माहिती
  2. दोन निवडणूक आयुक्तांची 15 मार्चपर्यंत नियुक्ती होण्याची शक्यता; निवडणुकांच्या तोंडावर आयोगावर आलाय भार
  3. लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

Last Updated : Mar 14, 2024, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.