हैदराबाद Elon Musk : सॅम ऑल्टमनद्वारा चालवल्या जाणाऱ्या OpenAI नं एलॉन मस्कला प्रत्त्यूत्तर दिलं आहे. OpenAI नं एलॉन मस्कच्या दाव्याचं खंडन करत त्यांनी आपलं ध्येय सोडल्याचा आरोप केला आहे. मस्क यांनी मानवतेच्या फायद्यासाठी AI विकसित करण्याचं आपलं मुख्य ध्येय सोडलं, असं ओपनएआयनं एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच त्यांनी मस्कचे सर्व दावे फेटाळले आहेत. मस्कनं गेल्या आठवड्यात त्याच्या सह-संस्थापित स्टार्टअपविरुद्ध कराराचा भंग केल्याचा आरोप करत खटला दाखल केल्याचा आरोप आहे.
मस्कला कंपनीचं सर्व नियंत्रण हवं होतं : सॅम ऑल्टमन यांनी चालवलेल्या कंपनीनं आरोप केला की, मस्कला कंपनीचं सर्व नियंत्रण स्वत:कडं हवं आहे."कपंनीला टेस्लामध्ये विलीन करून कंपनीचं नियंत्रण आपल्याकंड घ्यावं, असं मस्कला वाटत होतं. हा प्रस्ताव मस्क यांनी आम्हाला दिला होता. त्यानंतर कंपनीनं भांडवल निर्माण करण्यासाठी 2017 मध्ये एक फायदेशीर युनिट तयार करण्याचा निर्णय घेतला होता, असं OpenAI ने सांगितलं. OpenAI सह-संस्थापक ग्रेग ब्रॉकमन, इल्या सुत्स्केव्हर, जॉन शुलमन, सॅम ऑल्टमन, वोज्शिच झारेम्बा म्हणाले: “आम्ही एलॉनबरोबर नफा कमावण्याच्या अटींवर सहमत होऊ शकलो नाही. कारण त्यावेळी आम्हाला वाटलं कोणत्याही व्यक्तीकडं OpenAI वर नियंत्रण असणं कंपनीच्या नियमांच्या विरुद्ध आहे.
मस्कचा ओपनएआय सोडण्याचा निर्णय : आपल्या दाव्यात, मस्क म्हणाले की, ओपनएआयच्या तीन संस्थापकांनी AGI वर काम करण्यास सहमती दर्शविली होती. या प्रकल्पामुळं मानवाला OpenAI चा फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मस्क यांनी OpenAI ला टेस्लामध्ये विलीन करण्याचं सुचवलं होतं. त्यानंतर मस्कनं लवकरच ओपनएआय सोडण्याचा निर्णय घेतला, "आमच्या यशाची शक्यता शून्य असल्याचं सांगून त्यांनी टेस्लासाठी एजीआय स्पर्धक तयार करण्याची योजना आखली होती."
हे वाचलंत का :