नवी दिल्ली Election Commission Notice to AAP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं अटक केल्यानंतर मोठं राजकारण तापलं आहे. त्यातच आता केजरीवाल सरकारमधील मंत्री आतिशी यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे. भाजपाच्या आरोपावरुन निवडणूक आयोगानं ही नोटीस पाठवली आहे. "मला भाजपानं पक्षात येण्यासाठी संपर्क साधला होता," असा आरोप मंत्री आतिशी यांनी केला. त्यानंतर भाजपानं याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडं केली.
भाजपात सहभागी होण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा : दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी 2 एप्रिलला पत्रकार परिषद घेत दावा केला होता की, त्यांना भाजपाकडून पक्षात येण्याची ऑफर आली होती. याविषयी बोलताना, "मला भाजपासोबत येण्यास सांगण्यात आलं, अन्यथा येत्या महिनाभरात अंमलबजावणी संचालनालय माझ्या घरावर छापा टाकेल आणि मला अटक केली जाईल." तसंच मला, राघव चड्ढा, सौरभ भारद्वाज, आणि दुर्गेश पाठक यांना येत्या दोन महिन्यांत अटक करण्याचा भाजपाचा मानस असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
भाजपानंही पाठवली होती नोटीस : तत्पूर्वी भाजपाकडून मंत्री आतिशी यांना नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये आतिशी यांना विचारण्यात आलं होतं की त्यांना पक्षात येण्याची ऑफर कोणाकडून मिळाली आहे. त्याचा खुलासा करावा. कोणत्या व्यक्तीनं तुमच्याशी संपर्क साधला? तसंच याविषयी खुलासा न केल्यास कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असंही भाजपानं म्हटलं होतं.
वस्तुस्थिती आयोगासमोर मांडावी : आतिशी यांच्या विरोधात भाजपानं निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगानं आतिशी यांना नोटीस पाठवत 6 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या विधानाबाबत वस्तुस्थिती आयोगासमोर मांडण्यास सांगितलंय.
हेही वाचा :