ETV Bharat / bharat

रांची जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल - ED filed charge sheet Hemant Soren - ED FILED CHARGE SHEET HEMANT SOREN

ED filed charge sheet on Hemant Soren : रांची जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात आज शनिवार (30 मार्च) रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक पानांचं आरोपपत्र न्यायालयात सादर केलं आहे.

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 7:03 PM IST

Updated : Mar 30, 2024, 8:32 PM IST

रांची जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

रांची: ED filed charge sheet on Hemant Soren : ईडीच्या पथकानं आज शनिवार तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीचे अधिकारी मोठ्या बॉक्समध्ये कागदपत्रं घेऊन कोर्टात पोहोचले. न्यायालयात अनेक पानांचं आरोपपत्र सादर करण्यात आलं. हेमंत सोरेन यांना (दि. 31 जानेवारी) रोजी अटक करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांना 60 दिवसांच्या आत कोर्टात आरोपपत्र दाखल करायचं होतं. (ED files charge sheet against Soren) नियमानुसार, ईडीच्या पथकाने 60 दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता न्यायालयात सुनावणी होणार असून, आरोपपत्राच्या आधारे न्यायालय पुढील कारवाई होणार आहे.

दोन महिन्यांपासून जेलमध्ये : सोरेन यांच्यावर रांचीच्या बडगई भागात साडेआठ एकर जमिनीच्या (Ranchi land scam case) बेकायदेशीर नोंदणीचा आरोप आहे. अटकेनंतर सोरेन गेल्या 2 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. तुरुंगात जाण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री झाले.

छायाचित्रही न्यायालयासमोर दाखल : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपपत्रात नाव असलेल्या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बार्गेन झोनचे माजी उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद, विनोद सिंह आणि आणखी दोन जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तसंच, न्यायालयात हजारो पानांच आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. तसंच, ईडीच्या पथकाने पुरावा म्हणून काही रंगीत छायाचित्रेही न्यायालयासमोर सादर केली आहेत.

साडेआठ एकर जमिनीची नोंदणी : लष्कराची जमीन चुकीच्या पद्धतीने विकल्याच्या आरोपावरून ईडीने रांचीमध्ये छापा टाकला तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. बडगई झोनचे माजी उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांच्या घरात माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली आहेत. ईडीने भानू प्रताप प्रसाद यांना हेमंत सोरेन यांच्यासमोर बसवून क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. ज्यामध्ये भानू प्रताप प्रसाद यांनी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बडगई झोन क्षेत्रातील साडेआठ एकर जमिनीची नोंदणी नाकारण्यात मदत केल्याचं उघड झालं आहे.

हेही वाचा :

1 बारामतीचं ठरलं! नणंद विरुद्ध भावजय लढत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर - Supriya VS Sunetra

2 महाविकास आघाडीच्या बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जिंकण्याचा विश्वास - Amravati Lok Sabha

3 बायकोला अद्दल घडवायची पतीची शक्कल, थेट रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची दिली धमकी, नेमकं काय घडलं? जाणून घ्या - Dadar Railway Station

Last Updated : Mar 30, 2024, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.