नवी दिल्ली ATR against IPS Gyaneshwar Singh : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या वतीनं एससी-एसटी कायद्यांतर्गत आयपीएस ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात कारवाईचा अहवाल सादर केलाय. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांनी या कारवाईच्या अहवालावर 7 मार्च रोजी विचार करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण : समीर वानखेडे यांनी ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरोधात एससी-एसटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी केलीय. समीर वानखेडे यांच्या तक्रारीत ते एससी-एसटी समाजातून येत असल्याचं म्हटलंय. तपासादरम्यान ज्ञानेश्वर सिंह यांनी तपासाच्या कक्षेबाहेर जाऊन अनुसूचित जातीवाचक अपमान केल्याचा आरोप वानखेडे यांनी केलाय. तसंच समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की, ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्याला नोकरी गमवावी, अशी धमकी दिली. आपली बदनामी व्हावी, यासाठी ज्ञानेश्वर सिंह यांनी तपासाचा तपशील मीडियासमोर लीक केल्याचंही समीर वानखेडे यांनी सांगितलंय. वानखेडे यांच्या विरोधात जबाब देण्यासाठी ज्ञानेश्वर सिंह यांनी साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप वानखेडे यांनी तक्रारीत केलाय. याशिवाय वानखेडे आणि त्यांच्या समाजाचा जाहीर अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.
25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप : समीर वानखेडेंनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात मुंबईत अटक केली होती. त्यावेळी समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर होते. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर ईडीनं गुन्हाही दाखल केला होता. यावरुन महाराष्ट्रात चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप केले होते.
होही वाचा :