नवी दिल्ली Pooja Khedkar Relief From Arrest : बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयानं 5 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. न्यायालयाच्या या आदेशामुळं पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळालाय.
UPSC ला काढण्याचा अधिकार नाही : आज झालेल्या सुनावणीदरम्यान पूजा खेडकर यांची बाजू मांडणारे वकील म्हणाले, "एकदा नियुक्ती झाल्यानंतर यूपीएससी कोणालाही काढून टाकू शकत नाही. काढण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडं आहे. 2012 ते 2022 पर्यंत पूजा खेडकर यांनी नावात किंवा आडनावात कोणताही बदल केलेला नाही." तसंच पूजा खेडकर यांच्यावरील सर्व आरोप हे वकिलांनी फेटाळून लावले.
दिल्ली पोलिसांचा दावा : दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला. पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. हे प्रकरण नागरी सेवांमधील आरक्षित श्रेणींच्या गैरवापराशी संबंधित असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा निवड प्रक्रियेच्या निष्पक्षता आणि अखंडतेवर तसेच संपूर्ण परीक्षेवर थेट परिणाम होतो, असा दावाही दिल्ली पोलिसांनी केला.
पोलिसांनी का केला जामिनाला विरोध : दिल्ली पोलिसांचं म्हणणे आहे की, "तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुरक्षा दिली गेली तर याचिकाकर्ता पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतो. या प्रकरणाचा तपास सुरू आहे ज्यामध्ये चौकशी केली जाईल. अपंगत्व प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणे, शैक्षणिक किंवा वैद्यकीय संस्थांसारख्या इतर संस्थांकडून दाव्यांची पडताळणी करणे देखील समाविष्ट आहे. पूजा खेडकर यांना जामीन मंजूर झाल्यास, ती दिशाभूल करणारी माहिती देऊन किंवा या संस्थांवर रेकॉर्ड किंवा साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकून तपास प्रक्रियेत अडथळा आणू शकते. आतापर्यंतच्या तपासातून असे दिसून येते की या फसवणुकीत इतर लोकांचाही सहभाग आहे."
हेही वाचा -
- महाराष्ट्रासह देशात यूपीएससीचे 22 बोगस अधिकारी? सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा - UPSC Bogus officeres
- पूजा खेडकर यांच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल; दबाव पडला महागात - FIR On Pooja Khedkar Father
- कोणत्या पूजा खेडकर यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव?...पूजा खेडकर की पूजा दिलीपराव खेडकर ? विजय कुंभार यांचा स