ETV Bharat / bharat

"देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जातोय"; 21 दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं तिहार कारागृहात आत्मसमर्पण - CM Arvind kejriwal surrendering - CM ARVIND KEJRIWAL SURRENDERING

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी रविवारी संध्याकाळी तिहार तुरुंगात आत्मसपर्पण. याआधी त्यांनी आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन तुरुंगासाठी घर सोडलं आणि राजघाटावर पोहोचल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर हनुमान मंदिरात पूजा करून पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांच्या अंतरिम जामिनाचा २१ दिवसांचा कालावधी रविवारी पूर्ण झाला.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल (Etv Bharat English Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 7:55 PM IST

नवी दिल्ली Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी संध्याकाळी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं. त्यांच्या 21 दिवसांच्या अंतरिम जामीनाची मुदत संपली होती. तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. यानंतर कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

21 दिवसांत आराम केला नाही : कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयानं 21 दिवसांचा अंतरिम जामीन दिला यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो. या 21 दिवसांत मी आराम केला नाही, तर देशभर प्रचारासाठी गेलो. माझ्यासाठी आम आदमी पक्ष महत्त्वाचा नाही, आमच्यासाठी देश पहिलाय. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळं आज मी तुरुंगात जात आहे. पंतप्रधान मोदींकडे माझ्याविरोधात एकही पुरावा नाही. 500 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले, पण एक रुपयाही सापडला नाही, पुरावे मिळाले नाहीत."

देश वाचवण्यासाठी तुरुंगात जातोय : सरकारनं कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकणं म्हणजे हुकूमशाही आहे. हे लोक कोणत्याही पुराव्याशिवाय कोणालाही अटक करुन तुरुंगात टाकत आहेत. मी या हुकूमशाहीविरुद्ध लढत आहे. देशाला स्वतंत्र करण्यासाठी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात असल्याचं यावेळी केजरीवाल म्हणाले.

सर्व एक्झिट पोल बनावट : एक्झिट पोलवर बोलताना केजरीवाल म्हणाले की, "येणारे सर्व एक्झिट पोल बनावट आहेत. मतमोजणीच्या 3 दिवस आधी एक्झिट पोल घेण्याची काय गरज होती? मी तुम्हाला मतमोजणी संपेपर्यंत तिथंच थांबायला सांगितलंय. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी जुळल्यानंतर पुढं जा. या लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, म्हणूनच ते एक्झिट पोल घेत आहेत. एक्झिट पोलनं आधी कमी जागा दाखवल्या असत्या तर आरएसएस आणि भाजपामध्ये लढत झाली असती. हा एक्झिट पोल नसून मनाचा खेळ आहे."

अंतरिम जामीनाची मुदत संपली : सर्वोच्च न्यायालयानं केजरीवालांना निवडणूक प्रचारासाठी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. शनिवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टानं अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला होता. केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव आणखी एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती, परंतु ट्रायल कोर्टानं या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयानं 10 मे रोजी त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 21 मार्च रोजी अटक केल्यानंतर ते 10 दिवस अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत होते. त्यानंतर 1 एप्रिल रोजी न्यायालयानं त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात केली. त्यांनी तिहारमध्ये 39 दिवस घालवले.

हेही वाचा :

  1. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादीचा बोलबाला; तीन जागांवर विजय तर एक जागा दोन मतांनी निसटली - Arunachal Pradesh Results 2024
  2. अरुणाचलमध्ये भाजपाची सत्ता कायम, सिक्कीममध्ये एसकेएमनं बहुमताचा आकडा केला पार - Assembly Election results
  3. बालासोरप्रमाणं रेल्वे अपघात टळला! पंजाबमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक, नेमकं काय घडलं? - Fatehgarh Sahib Train Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.