नवी दिल्ली Arvind Kejriwal on CAA : केंद्र सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच (CAA) लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केलीय. यासोबतच आता देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झालाय. यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलंय. केंद्र सरकारच्या या निर्णयावरही टीका होतेय. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (CAA) पत्रकार परिषद घेतली. हा व्होट बँक निर्माण करण्याचा खेळ असून भाजपा व्होट बँकेचं राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भाजपा आपली व्होट बॅंक तयार करत आहे : भाजपावर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, "की," भाजपानं 10 वर्षात काम केलं असते तर त्यांना निवडणुकीपूर्वी CAA आणण्याची गरज भासली नसती. CAA अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सुमारे 2.5 कोटी ते 3 कोटी अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिलं जाईल. मोदी सरकार देशाचा हक्क पाकिस्तानींना देत आहेत. CAA मुळं ईशान्येकडील राज्यांचं अधिक नुकसान होणार आहे. इतर देश बाहेरच्या लोकांना येण्यापासून रोखतात. भाजपानं निवडणूक फायद्यासाठी CAA आणलाय. CAA मागं घ्यावा अशी देशाची मागणी आहे. देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. भाजपानं 10 वर्षात काम केलं असते तर त्यांना निवडणुकीपूर्वी CAA आणण्याची गरज भासली नसती. CAA अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सुमारे 2.5 कोटी ते 3 कोटी अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिलं जाईल. भारतातील महागाईनं कंबरडं मोडलंय. बेरोजगारीचं प्रमाण शिगेला पोहोचलय. तरुणांना नोकऱ्यांसाठी दारोदारी पायपीट करावी लागत आहे."
-
CAA क़ानून देश के हित में नहीं है। कैसे? इस वीडियो को ज़रूर देखें और ज़्यादा से ज़्यादा लोगों को दिखाएं … pic.twitter.com/j0QKKQEK8m
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 13, 2024
आमच्या हक्काच्या घरात पाकिस्तानी बसवायचे आहेत : भाजपावर टीका करताना केजरीवाल पुढं म्हणाले की, " बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व घ्यायचं असेल, तर त्यांनाही नागरिकत्व दिलं जाईल, असं केंद्रातील भाजपा सरकारचं म्हणणं आहे. याचाच अर्थ अल्पसंख्यांकातील लोक मोठ्या संख्येनं आपल्या देशात आणले जातील. त्यांना नोकऱ्या दिल्या जातील. त्यांच्यासाठी घरं बांधली जातील. भाजपा आमच्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही. पण त्यांना पाकिस्तानातून येणाऱ्या मुलांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. देशातील बरेच लोक बेघर आहेत. पण भाजपाला पाकिस्तानातून आलेल्या लोकांना इथं स्थायिक करायचंय. त्यांना आमच्या हक्काच्या घरात पाकिस्तानी लोकांना जागा द्यायची आहे. भारत सरकारकचा पैसा आपल्या कुटुंबाच्या आणि देशाच्या विकासासाठी वापरला पाहिजे. मात्र, त्याचा वापर पाकिस्तानी लोकांसाठी करण्यात येणार आहे."
आमचा याला विरोध राहील : आपचे संस्थापक केजरीवाल पुढे म्हणाले, "आम्ही कोणत्याही परिस्थितीत इतर देशांतील लोकांना आमच्या मुलांचा रोजगार घेऊ देणार नाही. याला आमचा तीव्र विरोध राहील. ते परत न घेतल्यास या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात मतदान करुन संताप व्यक्त करा. तुम्ही पाकिस्तानी लोकांना बोलावून रोजगार देऊ इच्छिता, हे माझ्या समजण्याच्या पलीकडं आहे. भारताची वाटचाल बाकीच्या जगाच्या विरुद्ध आहे. जगभरातील देश इतर देशांतील गरीब लोकांना येण्यापासू रोखतात. मात्र, आम्ही दरवाजे उघडत आहोत. भारत सोडून गेलेल्या उद्योगपतींना परत आणा. जेणेकरुन नवीन कारखाने सुरू होतील. त्यांच्या मुलांना रोजगार मिळेल, असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा :