हैदराबाद Defense Manufacturing Is Booming : सध्या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्या मोठ्या नफ्यात असल्याचं दिसून येत आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) या संरक्षण क्षेत्रातील कंपनीनं मागील आर्थिक वर्षात 2 हजार 350 कोटी रुपयांची उलाढाल केली. भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीकडं सध्या 19 हजार 468 कोटी रुपयांच्या ऑर्डर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कंपनीकडं 2 हजार 500 कोटी रुपयांच्या निर्यात ऑर्डर्स आहेत. केवळ भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीच नाही, तर संरक्षण क्षेत्रातील अनेक कंपन्या अलीकडच्या काळात मोठा नफा मिळवत असल्याचं दिसून येत आहे.
अगोदर या देशांकडून करण्यात येत होती शस्त्रे आयात : देशात अगोदर संरक्षण क्षेत्रातील शस्त्रे बनवण्यात येत नव्हती. भारत तेव्हा इतर देशांकडून शस्त्रे आयात करत होता. मागील अनेक दशकांपासून देशात संरक्षण उपकरणांसाठी आयातीवर अवलंबून राहत होता. यात रशिया, इस्रायल, आणि फ्रान्स आदी देशातून शस्त्रे, विमानं, इलेक्ट्रीक उपकरणं आणि युद्धनौका आयात करण्यात येत होत्या. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. आता देशातील कंपन्यांमध्ये उपकरणं तयार होत आहेत. त्यामुळे भारतातील संरक्षण कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत.
भारत करत आहे 21 हजार कोटीपेक्षा जास्त निर्यात : भारतात आता संरक्षण क्षेत्रातील उपकरणं तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे मागील चार ते पाच वर्षापासून संरक्षण उत्पादनाच्या निर्यातीत झपाट्यानं वाढ झाली आहे. देशात 2023 ते 2024 या वर्षात 21 हजार 083 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. तर 2022 ते 2023 या कालावधित भारतानं 15 हजार 918 कोटींची निर्यात केली आहे. भारत या अगोदर संरक्षण क्षेत्रातील उपकरणांसाठी मोठ्या प्रमाणात इतर देशातून आयातीवर अवलंबून होता. मात्र आयातीवर अवलंबून असलेला देश निर्यातीकडं वळेल, असा कोणी विचारही केला नव्हता. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे संरक्षण क्षेत्रातील देशांतर्गत कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणलं आहे. अनेक परदेशी कंपन्यांसोबत भारतानं करार केला आहे. त्यामुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षमता प्रचंड वाढली आहे.
विविध देशांना संरक्षण उत्पादनांची निर्यात : भारतात आता विविध संरक्षण क्षेत्रातील उपकरणांचं उत्पादन होत आहे. त्यामुळे भारत आता इजिप्त, इटली, यूएई, भूतान, इथिओपिया, सौदी अरेबिया आदी देशात मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहे. भारतातून आखाती देशांमध्ये संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे, असं जेफरीज या अग्रगण्य सल्लागार सेवा कंपनीनं अलीकडंच स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :