देहराडून Kedarnath Rescue Operation : केदारनाथ परिसरात 31 जुलैला झालेल्या अपघातात अनेकांनाचा बळी गेला आहे. या परिसरात आताही शोधमोहीम सुरू आहे. या शोधमोहिमेत बचाव पथकाला तीन मृतदेह आढळून आले आहेत. केदारनाथ मार्गावर तीन मृतदेह आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. केदारनाथ मार्गावरील लिंचोली इथं ढिगाऱ्याखाली बचाव पथकाला हे तीन मृतदेह आढळून आलले. त्यानंतर मृतदेह आढळून आल्याची माहिती एसडीआरएफला देण्यात आली. एसडीआरएफच्या पथकानं घटनास्थळ गाठून हे मृतदेह बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
कामगारांना आढळून आले मृतदेह : केदारनाथ इथल्या मार्ग दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. केदारनाथ परिसरात भाविकांना पायी प्रवास करण्यासाठी हा मार्ग महत्वाचा आहे. त्यामुळे प्रशासनानं तत्काळ मार्ग दुरुस्तीचं काम हाीत घेतलं आहे. 15 ऑगस्टला लिंचोली इथल्या पदपथावरील मलबा हटवत असताना कामगारांना काही मृतदेह दिसून आले. त्यामुळे हादरलेल्या कामगारांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रेम सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झालं. एसडीआरएफ पथकानं ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली. त्यानंतर या ठिकाणावरुन तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृतदेहांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान : केदारनाथ इथल्या मार्गावर मोठी दरड कोसळून अनेक भाविकांचा मृत्यू झाला. या परिसरातील ढिगाऱ्याखाली अद्यापही मृतदेह आढळून येत आहेत. गुरुवारी कामगारांना मृतदेह आढळून आल्यानंतर इथं आणखी शोधकार्य करण्यात आलं. यावेळी तीन मृतदेह इथल्या ढिगाऱ्याखाली आढळून आले. एसडीआरएफ पथकानं हे मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. पोलिसांकडून मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मात्र मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढं उभं ठाकलं आहे. 31 जुलैच्या रात्री केदारनाथ पदपथावर झालेल्या अपघातानंतर 15 हजार भाविकांसह स्थानिक नागरिकांचं बचावकार्य करण्यात आलं. केदारनाथ यात्रा मार्गावर अजूनही भाविकांचे मृतदेह सापडत आहेत. केदारनाथ मार्गावर 260 पेक्षा अधिक कामगार पदपथ मार्गाच्या दुरुस्तीचं काम करत आहेत.
हेही वाचा :
- केदारनाथ भूस्खलन प्रकरण : आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 9099 भाविकांचं रेस्क्यू; सैन्य दलानं संभाळली बचावकार्याची कमान - Kedarnath Rescue Operation
- मुसळधार पावसामुळं उत्तराखंडमध्ये दहा जणांचा मृत्यू; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळं 50 जण बेपत्ता, केदारनाथ यात्रा स्थगित - Cloudbursts in Uttarakhand Himachal
- उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; महाराष्ट्रातील दोघांसह 3 यात्रेकरुंचा मृत्यू, 5 जखमी - Kedarnath land slide incident