चेन्नई : देशात सध्या फेंगल चक्रीवादळानं मोठी दहशत पसरली आहे. फेंगल चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीकडं पुढं सरकत आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या हवामानात मोठा बदल घडून आला आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यावरील प्रदेशात मुसळधार पावसासह समुद्रात उंच लाटा उठण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या, असं भारतीय हवामान विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Cyclone Fengal: Coastal areas witness changes in weather with high tides, rain in Tamil Nadu
— ANI Digital (@ani_digital) November 29, 2024
Read @ANI Story | https://t.co/tTGEeIqonT#CycloneFengal #TamilNadu pic.twitter.com/7xkhmXoQPC
भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला इशारा : भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD), फेंगल चक्रीवादळ उद्या संध्याकाळी किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीतील नागरिकांना इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात नैऋत्येला असलेलं फेंगल हे चक्रीवादळ गेल्या सहा तासात 7 किमी/तास वेगानं उत्तर-वायव्य दिशेनं पुढं सरकलं. 29 नोव्हेंबरच्या रात्री 11:30 पर्यंत, ते त्याच प्रदेशात होतं. सध्या फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीच्या 210 किमी पूर्वेस आणि चेन्नईच्या आग्नेयेस 210 किमी अंतरावर आहे.
Cyclone Fengal: EMU trains in Suburban section of Chennai division to operate at reduced frequency intervals
— ANI Digital (@ani_digital) November 30, 2024
Read @ANI Story | https://t.co/I533AWZkaX#cycloneFengal #Chennai #EMUtrains pic.twitter.com/cSKVaqIAuS
चक्रीवादळाचा वेग वाढण्याची शक्यता : सध्या फेंगर चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेनं पुढं सरकण्याची शक्यता आहे. उत्तर तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारा ओलांडून कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान पुद्दुचेरीजवळ ताशी 70-80 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. आज दुपारी चक्रीवादळाचा जोर वाढून तो ताशी 90 किमी इतका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेंगल चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी जमिनीवर धडण्याची शक्यता असल्यानं चेन्नईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक डॉ. एस. बालचंद्रन यांनी तामिळनाडूच्या किनारी भागाला सर्वाधिक फटका बसेल, अशी माहिती शुक्रवारी दिली. त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं, की "बहुतेक किनारपट्ट्यावरील जिल्हे, पुद्दुचेरीजवळ कराईकल आणि महाबलीपुरममधील क्रॉसिंग पॉईंटला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तेथे वाऱ्याचा वेग प्रचंड राहुन जोरदार पाऊस पडेल. आज वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी पोहोचला आहे. दुपारी 1:00 ते 2:00 दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे."
हेही वाचा :