नवी दिल्ली Rahul Gandhi LoP in Lok Sabha : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली.
" congress mp rahul gandhi has been appointed as the lop in the lok sabha, says congress general secretary kc venugopal pic.twitter.com/8AYbBlkEbV
— ANI (@ANI) June 25, 2024
विरोधी पक्षनेतेपद भुषवणारे तिसरे गांधी : राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेले गांधी घराण्यातील तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी हे पद भूषवलं होतं. ९ जून रोजी झालेल्या काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करावी, यासंदर्भातील ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र, मला यासंदर्भात विचार करण्यासाठी वेळ द्या, असे राहुल गांधी म्हणाले होते. अखेर मंगळवारी (25 जून) राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
दहा वर्षानंतर लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता : लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेल्या 10 वर्षांपासून रिक्त होते, कारण गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ मिळालं नव्हतं. आता 10 वर्षांनंतर राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ९९ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्यासाठी पक्षाकडं ५५ खासदार असणे आवश्यक आहे.
काँग्रेस कार्यकारिणीनं केली होती राहुल गांधी यांच्या नावाची शिफारस : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते करण्याची शिफारस एकमताने करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर राहुल यांनी यावर निर्णय घेण्यासाठी वेळ हवा असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा -
- राहुल गांधींनी NDA सरकारच्या पहिल्या 15 दिवसांचा मागितला 'हिशोब'; घोटाळ्यांची यादी देत सरकारवर खरमरीत टीका - Rahul Gandhi
- नीट परीक्षेचा घोळ थांबेना : पेपर फुटीसह शिक्षण माफियांसमोर पंतप्रधान मोदी हतबल झालेत, विरोधकांचा हल्लाबोल - NEET PG Exam Postponed
- रशिया-युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या मोदींना पेपर लीक का थांबवता आलं नाही; भाजपाचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा - राहुल गांधी - Rahul Gandhi on NEET