ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत ९ नक्षलवादी ठार - Bijapur Naxal Encounter

Bijapur Naxal Encounter छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त असलेल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. यावेळी सुरक्षा दलानं केलेल्या गोळीबारात ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. बीजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी कारवाई झाल्याबाबत पुष्टी केली आहे.

Chhattisgarh Naxal Encounter
Chhattisgarh Naxal Encounter
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 2:26 PM IST

रांची Bijapur Naxal Encounter - बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोरचोली आणि लेंड्रा जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. या कारवाईत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांकडून आणखी शोध मोहिम सुरू आहे.

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी डीआरजी, सीआरपीएफचे कोबरा बटालियन, बस्तर फायटर्स, एसटीएफ आणि सीएएफच्या जवानांच्या संयुक्त टीम ही नक्षलविरोधी अभियान करण्यास सुरुवात केली. सुरक्षादलाचे जवान हे आज सकाळी ६ वाजता कोरचोली आणि लेंड्रा जंगलात पोहोचले. तेव्हा नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार केला. जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिला. त्यात ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतेले आहेत. त्यांच्याजवळ एलएमजी, एके ४७ सारखे स्वयंचलित बंदुका आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा सापडला आहे. सुरक्षा दलानं केलेल्या गोळीबारात काही नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता आहे. तर सर्व जवान सुरक्षित आहेत.

  • बिजापूरचे एएसपी म्हणाले, "ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही. नक्षलवाद्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर किती बक्षीस होते, ही माहिती समोर येणार आहे.

लोकसभा निवडणूक शांततेत पार पडण्याची शक्यता- लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. त्यातच सुरक्षा दलानं कठोर कारवाई केली आहे. बस्तरमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नक्षलवाद्यांकडून लोकसभा निवडणुकीत मतदारांसह उमदेवारांना धमकाविण्याचे प्रकार घडत असतात. सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांवरील केलेल्या कारवायांमुळे नक्षलग्रस्त भागात लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुका शांततेत पार पडण्यास मदत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाची कारवाई ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

छत्तीसगडमध्ये झालेल्या मोठ्या कारवाया

  • 7 फेब्रुवारी 2024: विजापूरमध्ये 4 नक्षलवादी ठार
  • 3 फेब्रुवारी 2024: नारायणपूरमध्ये 2 नक्षलवादी ठार.
  • 24 डिसेंबर 2023: दंतेवाडा सुकमा सीमेवर 3 नक्षलवादी ठार
  • 21 ऑक्टोबर 2023: कांकेरच्या कोयलीबेडा येथे 2 नक्षलवादी ठार.
  • 20 सप्टेंबर 2023: दंतेवाडा येथे दोन महिला नक्षलवादी ठार.
  • 23 डिसेंबर 2022: विजापूर आणि महाराष्ट्राच्या सीमेवर 2 नक्षलवादी ठार.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.