उत्तर प्रदेश (गोंडा) Chandigarh Dibrugarh Train Derailed : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी तत्काळ बचाव, मदत कार्य करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं.
चार प्रवाशांचा मृत्यू : अपघातामागील कारण अद्याप समजू शकलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेनच्या 10 हून अधिक बोगी रुळावरून घसरल्या आहेत, तर दोन-तीन बोगी उलटल्या आहेत. रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घटनास्थळी मदत, बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर, रेल्वेनं हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत - 8957409292 (लखनऊ जंक्शन), 8957400965 (गोंडा).
जखमींवर उपचार सुरू : ट्रेन क्रमांक 15904 चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेस चंदीगडहून गोरखपूरला जात होती. मोतीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील पिकौरा गावाजवळ हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास 10 हून अधिक डबे रुळावरून घसरले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.
आसामचे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या संपर्कात : आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंता बिस्वा सरमा यांनी उत्तर प्रदेशातील दिब्रुगड-चंदीगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याच्या घटनेची माहिती घेतली. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आसाम सरकार संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. ईशान्य रेल्वेच्या लखनऊ विभागानं हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
रेल्वेनं हेल्पलाइन क्रमांक केले जाहीर :
रेल्वे मेडिकल टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसंच प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी ईशान्य रेल्वेनं हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
- व्यावसायिक नियंत्रण : 9957555984
- फर्केटिंग (FKG) : 9957555966
- मारियानी (MXN) : 6001882410
- सिमलगुरी (SLGR) : 8789543798
- तिनसुकिया (NTSK) : 9957555959
- दिब्रुगड (DBRG) : 9957555960